PM Modi Speech on Manipur Violence: मुंबई: मणिपूर हिंसाचारवर (Manipur violence) सभागृहात निवेदन करण्यास तयार नसल्याचं म्हणत विरोधकांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या अविश्वास प्रस्तावावर तब्बल तीन दिवस सभागृहात चर्चा झाली. ज्यानंतर सगळ्यात शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज (10 ऑगस्ट) सभागृहात भाषण झालं. मोदींनी तब्बल 2 तासाहून अधिक वेळ भाषण केलं. पण भाषणातील पहिले दीड तास ते मणिपूर हिंसाचारावर एकही शब्द बोलले. त्यामुळे बराच वेळ गदारोळ देखील घातला. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी बोलण्यास तयार नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. (no confidence motion pm modi started talking about violence in manipur after the opposition walked out of the lok sabha)
ADVERTISEMENT
ज्या क्षणाला विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर तात्काळ मोदींनी मणिपूरवर बोलण्यास सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मोदींनी काँग्रेसवर सातत्याने टीका केली. तसंच काँग्रेसच्या राजकारणामुळेच ईशान्येकडील राज्यांची अवस्था वाईट असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
अन् पंतप्रधान मोदी मणिपूरवर बोलले…
मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. त्यांनी आरोप केला की, ‘मोदी मणिपूरवर बोलत नाहीत.’ आणि ते लोकसभेतून निघून गेले. यानंतर मोदींनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.. ते म्हणाले की, ‘ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते बोलायला तर तयार आहेत पण ऐकायला मात्र अजिबात तयार नाहीत. ते खोटे बोलून पळून जातात.’
यानंतर मोदींनी मणिपूरवर बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘याबाबत जर विरोधकांनी गृहमंत्र्यांनी दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असती तर फक्त मणिपूरवर दीर्घ चर्चा होऊ शकली असती. पण त्यांना फक्त याबाबत राजकारण करायचं होतं.’ असं मोदी म्हणाले.
हे ही वाचा >> Amol Kolhe: ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’, अमोल कोल्हेंनी लोकसभा दणाणून सोडली!
अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्ष हे सर्व विषयांवर बोलले. त्यामुळे आमचं देखील कर्तव्य आहे की, देशाचा आमच्यावर असलेल्या विश्वास प्रकट करण्यासाठी आम्हाला देखील सर्व मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे.
मोदी पुढे म्हणाले की, गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केले आहे. मात्र विरोधकांना राजकारणाशिवाय दुसरे काही दिसत नाही.
मणिपूरमध्ये न्यायालयाचा निर्णय आला. त्यानंतर तिथे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आणि हिंसाचार सुरू झाला. अनेकांनी आपले जवळचे प्रियजन गमावले, महिलांवर अत्याचार झाले. पण दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाने विश्वास ठेवावा, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत.
पंतप्रधान मोदींनी केला कच्छतीवूचा उल्लेख
दरम्यान, यानंतर मोदींनी द्रमुकच्या खासदारांना डिवचण्यासाठी एक वेगळाच मुद्दा काढला. ते म्हणाले.. कच्छतीवू म्हणजे काय? हे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मला सांगावे, द्रमुकचे लोक, त्यांचे मुख्यमंत्री मला पत्र लिहून कच्छतीवूला परत आणण्यास सांगतात. पण कोणाला माहिती आहे का कच्छतीवू नेमकं काय आहे, ते कुठे आहे.. तर ते तामिळनाडूच्या पुढे, श्रीलंकेच्या आधी एक बेट आहे. जे बेट दुसऱ्या देशाला देण्यात आलं. तो काही भारताचा भाग नव्हता? हे सगळं इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली घडलं.
पंतप्रधान मोदींनी केला तीन घटनांचा उल्लेख
मोदी ईशान्येला देशाचा भाग मानत नाहीत, असे विरोधी पक्षांनी म्हटले होते. याला विरोध करताना मोदींनी तीन घटनांचा उल्लेख केला.
मोदी म्हणाले की, 5 मार्च 1966 रोजी काँग्रेसने मिझोराममधील नागरिकांवर हवाई दलाच्या मदतीने हल्ला केला होता. मिझोरामचे ते लोकं काय भारताचे नागरिक नव्हेत का? निष्पाप नागरिकांवर काँग्रेसने हल्ले केले होते. आजही 5 मार्चला संपूर्ण मिझोरम शोक व्यक्त करत असतो. काँग्रेसने हे सत्य लपवले, जखम भरण्याचा प्रयत्न कधी केला नाही. यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. अकाल तख्तवरील हल्ल्याची आठवण सगळ्यांना आहे, पण असे हल्ले आधीच सुरू झाले होते.
हे ही वाचा >> PM Modi: ‘अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ’, पंतप्रधान मोदी लोकसभेत असं का म्हणाले?
दुसरी घटना 1962 ची आहे. चीनकडून देशावर हल्ले होत होते. लोकांना मदतीची अपेक्षा होती. अशा कठीण काळात पंडित नेहरू म्हणाले होते की, my heart goes out to the people of Assam. नेहरूंनी तिथल्या लोकांना त्यांच्या नशिबावर जगायला सोडलं होतं.
मोदी पुढे म्हणाले की, जे स्वत:ला लोहियांचे वारसदार म्हणवतात. त्याच लोहिया यांनी नेहरूंवर आरोप केले होते की, नेहरू जाणूनबुजून ईशान्येचा विकास करत नाहीत. तो भाग सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित ठेवण्यात आला.
मोदी पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने लक्ष दिले नाही. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे काळजाचा तुकडा आहे. ईशान्य, मणिपूरमधील सद्यस्थितीला काँग्रेसच कारणीभूत असल्याचे मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT