Lok Sabha : PM मोदींचा जोरदार हल्लाबोल, ‘घराणेशाहीमुळे काँग्रेसच्या दुकानाला टाळं…’

प्रशांत गोमाणे

05 Feb 2024 (अपडेटेड: 05 Feb 2024, 01:12 PM)

PM Modi Lok Sabha Speech : घराणेशाहीचा जेवढा फटका देशाला बसला, तितकाच फटका काँग्रेसलाही बसला.खर्गे या सभागृहातून त्या सभागृहात गेले. गुलाम नबी यांनी पक्षातूनच पक्षांतर केले. हे सर्वजण घराणेशाहीचे बळी ठरले. काँग्रेसने तेच प्रॉडक्ट पुन्हा पुन्हा सुरू केल्यामुळे त्यांच्यावर स्वतःचे दुकान बंद करायची वेळ आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

pm narendra modi criticize rahul gandhi opposition parliament on motion thanks on president address  

pm narendra modi criticize rahul gandhi opposition parliament on motion thanks on president address  

follow google news

PM Modi Lok Sabha Speech: विरोधकांच्या संकल्पाचं मी कौतुक करतो. यामुळे माझा आणि देशाचा आत्मविश्वास वाढला आहे. कारण विरोधकांनी तिकडे दीर्घकाळ राहण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. आता जसे तुम्ही अनेक दशकभर इथे बसला होता, तसेच अनेक दशकभर तिथे बसण्याचा तुमचा संकल्प जनता पूर्ण करेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधकांवरल लगावला आहे. (pm narendra modi criticize rahul gandhi opposition parliament on motion thanks on president address)

हे वाचलं का?

राष्ट्रवादीच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आजकाल तुम्ही (विरोधक) ज्या प्रकारे मेहनत घेत आहात, त्यावर जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल आणि तुम्ही ज्या उंचीवर आता आहात त्यापेक्षा जास्त उंचीवर तुम्ही नक्कीच पोहोचाल आणि पुढच्या निवडणुकीत तर प्रेक्षक गॅलरीतच बसाल अशी खिल्ली मोदींनी विरोधकांची उडवली.

हे ही वाचा : मामाची भाचीवर वाईट नजर पडली आणि…संपूर्ण गावं हादरलं

विरोधक किती काळ समाजात फूट पाडत राहणार आहेत. या लोकांनी देशाचे खूप तुकडे केले आहेत. निवडणुकीचे वर्ष आहे, थोडे कष्ट करूया. काहीतरी नवीन बाहेर आणा. नाहीतर तीच जुनी ढफली आणि जुना राग, मला पण काही शिकू दे, असे मोदी म्हणाले आहेत.

मोदी पुढे म्हणाले, काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. दहा वर्षे कमी नाहीत. पण ती जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले. ते स्वत: अपयशी ठरले तेव्हा विरोधी पक्षात काही चांगले लोक होती, पण त्यांनाही पुढे येऊ दिले नाही, जर त्याची प्रतिमा ठळक दिसली की ती दडपली जायची. एकप्रकारे त्यांनी स्वतःचे आणि विरोधकांचेही इतके मोठे नुकसान केले. त्यामुळे देशाला निरोगी आणि चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मला नेहमीच वाटते.

हे ही वाचा : Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवार ‘या’ नेत्याला उतरवणार मैदानात?

घराणेशाहीचा जेवढा फटका देशाला बसला, तितकाच फटका काँग्रेसलाही बसला.खर्गे या सभागृहातून त्या सभागृहात गेले. गुलाम नबी यांनी पक्षातूनच पक्षांतर केले. हे सर्वजण घराणेशाहीचे बळी ठरले. काँग्रेसने तेच प्रॉडक्ट पुन्हा पुन्हा सुरू केल्यामुळे त्यांच्यावर स्वतःचे दुकान बंद करायची वेळ आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

    follow whatsapp