Ramdas Kadam vs Sanjay Raut: रत्नागिरी: बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv sena) पक्षाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे शिवसेनेच्या (ठाकरे गट) एकाही नेत्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. जेव्हापासून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केलं तेव्हापासूनच रामदास कदम हे प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. त्याआधी मागील तीन वर्षाच्या काळात रामदास कदम हे जवळजवळ व्हिजनवासात गेले होते. मात्र, आता पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रीय झाले असून ठाकरे गटावर (Thackeray group) सातत्याने टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच आता त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधत अत्यंत जहरी अशी टीका केली आहे. (ramdas kadam criticized shiv sena mp sanjay raut on karnataka border issue)
ADVERTISEMENT
‘संजय राऊत पळपुटा असल्यासारखं वागू नका, कर्नाटकात जायच्या भीतीने शेपूट का घालताय’, असा सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले:
‘मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की, संजय राऊत हे तर स्वत:ला वाघ समजतात. ते कुणाला भीत नाही, कोणाला घाबरत नाही. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून अनेक लोकांनी आंदोलनं केली. त्यापैकी मी एक आहे. 2006 साली जेव्हा बेळगाव महापौराच्या तोंडाला काळं फासलं होतं. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मला पाठवलं होतं. 2006 ची केस आता काढली. मला अटक करण्यासाठी वॉरंट काढलं. ते पण अजामिनपात्र. मी जेव्हा बेळगावला गेलो तेव्हा तिथले शेकडो मराठी माणसं माझ्या स्वागतासाठी उभे राहिले. दहा लाखांचा अटकपूर्व जामीन माझा तिथल्या मराठी माणसाने दिला. प्रत्येक जण माझ्यासाठी 7/12 चे उतारे घेऊन आले माझ्यासाठी. मी तर नाही पैसे घेऊन गेलो.’
‘तिथल्या मराठी माणसाने मला पैसा दिला. मग संजय राऊत तुम्ही घाबरता का, आहेत ना आपली मराठी माणसं तिथे.’
‘तुम्ही कधीपासून इतके पळपुटेपणा करायला लागले, मला भिती वाटते, माझ्यावर हल्ला होईल.. हे सगळं कशासाठी करता. कालपर्यंत तर तुम्ही वाघासारखी डरकाळी फोडत होतात. आपला मराठी माणूस घाबरतोय एवढा. संजयजी तुम्ही शेपूट घालू नका.. अशी माझी तुम्हाला विनंती आहे.’
‘महाराष्ट्र कालपर्यंत वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पाहत होता आणि इतका अचानक तुमच्यामध्ये बदल का झाला? त्याचं मोठं आश्चर्य वाटतंय. जा तुम्ही बेळगावला.. तिथे आपली मराठी माणसं आहेत. मला जामीन दिला तुम्हालाही देतील.’
‘मी दहा लाखांचा अटकपूर्व जामीन घेतला आणि प्रत्येक तारखेला मी बेळगावला जातो. माझ्यावर हल्ला नाही कोणी केला. मराठी माणसं खंबीरपणे आहेत. तेव्हा मित्र म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे माझा. एक महाराष्ट्राचा नेता शेळपट, पळपुटा आहे, तो घाबरतोय, शेपटी घातलीय.. कृपा करुन असा मेसेज देऊ नका.’ अशा शब्दात रामदास कदम यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
दरम्यान, आता संजय राऊत हे रामदास कदमांच्या या जहरी टीकेला नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT