Ram Mandir : “उद्धव ठाकरेही अयोध्येला जाणार, पण…”, राऊतांनी सांगितला प्लॅन

प्रशांत गोमाणे

• 08:19 AM • 28 Dec 2023

राम मंदिरासाठी शिवसेनेनेही रक्त सांडलय. अयोध्येत बाळासाहेब ठाकरे गेले होते. त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक अयोध्येत कारसेवा करत होते. त्यामुले राम मंदिर निर्माणात आमचंही रक्त आणि घाम लागल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

sanjay raut reaction on ram mandir temple inaugration and invitation controversy udhhav thackeray ayodhya tour maharashtra politics

sanjay raut reaction on ram mandir temple inaugration and invitation controversy udhhav thackeray ayodhya tour maharashtra politics

follow google news

Sanjay Raut Reaction on Ram Mandir Inaugration : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. असे असतानाच आता शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील राममंदिर(Ram Mandir) सोहळ्याला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.यावर आता ठाकरेंचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला आहे. (sanjay raut reaction on ram mandir temple inaugration and invitation controversy udhhav thackeray ayodhya tour maharashtra politics)

हे वाचलं का?

खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, राम मंदिरासाठी शिवसेनेनेही रक्त सांडलय. अयोध्येत बाळासाहेब ठाकरे गेले होते. त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक अयोध्येत कारसेवा करत होते. त्यामुले राम मंदिर निर्माणात आमचंही रक्त आणि घाम लागल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Ajit Pawar Amol Kolhe : “हिंमत उरली नाही का?”; कोल्हेंचा अजित पवारांवर पहिला वार

दरम्यान उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिकेतून डावलल्याचाही प्रश्न त्यांना विचारला होता. यावर राऊत म्हणाले, निमंत्रण पत्रिकेवरून राजकारण होत असते. भाजपच्या कार्यक्रमात कोण जाईल? हा देशाचा राष्ट्रीय कार्यक्रम नाही आहे. भाजप हा स्वत:चा उत्सव आणि प्रचार करते आहे.भाजप सभा, रॅली करते आहे पण पवित्रता कुठे आहे, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर टीका केली.यासोबत पत्रकारांनी त्यांना तुम्ही जाणार आहात का? असा सवाल केला होता. यावर राऊत म्हणाले,नक्कीच जाऊन, का नाही जाणार, भाजपचा कार्यक्रम संपल्यावर नक्कीच जाऊ, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर हल्ला चढवला.

दरम्यान भाजप जेव्हा एखादी प्रचार यंत्रणा लावते,तेव्हा ती कसलीच कसर ठेवत नाही.संपूर्ण देशात त्यांची प्रचाराची एक रित आहे. प्रचार करा आणि सगळं आम्हीच केलं आहे इतर कोणी नाही असे भासवतात. हा सर्व प्रकार करून संपूर्ण देशाच्या जनतेला बेरोजगारी, महागाई, मणिपूरची घटना विसरण्यासाठी हा सगळा घाट घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

    follow whatsapp