'शिंदे साहेब बाळासाहेबांनंतर तुम्हीच शिवसेना घडवली', आशा भोसलेंवर रश्मी ठाकरे संतापल्या!

Asha Bhosle vs Rashmi Thackeray: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी बाळासाहेबांनंतरची खरी शिवसेना उभारण्याचं श्रेय एकनाथ शिंदेंना दिल्यामुळे रश्मी ठाकरे या प्रचंड नाराज झाल्या आहेत.

आशा भोसलेंवर रश्मी ठाकरे संतापल्या!

आशा भोसलेंवर रश्मी ठाकरे संतापल्या!

ऋत्विक भालेकर

10 Feb 2025 (अपडेटेड: 10 Feb 2025, 11:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदे साहेब बाळासाहेबांनंतर तुम्हीची खरी शिवसेना घडवली, आशा भोेसलेंचं विधान

point

आशा भोसलेंच्या विधानावर रश्मी ठाकरे संतापल्या

point

मध्यस्थांमार्फत रश्मी ठाकरेंनी आाशा भोसलेंपर्यंत पोहचवली नाराजी

मुंबई: 'जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्हीही शिवसेना घडवली.  सगळे तुमच्यावर धावून आले होते. त्यावेळेला तुम्ही सगळ्यांना तोंड दिलं.. चांगलं कार्य करत राहिल्याने कोणीही, कधीही संपत नाही.' अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एका जाहीर कार्यक्रमात कौतुक केलं होतं. पण त्यांच्या याच विधानाने 'मातोश्री' मात्र प्रचंड नाराज झाली असून उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

हे वाचलं का?

सगळ्यात आधी आपण पाहूयात की, आशा भोसले नेमकं काय म्हणाल्या होत्या... 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलाताना आशा भोसले म्हणालेल्या की, 'तुम जियो हजारो साल... तुमच्यासाठी हे गातेय मी शिंदे साहेब.. तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही. आम्हाला माहीत नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात..'

हे ही वाचा>> Sanjay Raut: "एकनाथ शिंदे भाजपसमोर सरपटणारं प्राणी...", संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

'जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही परत शिवसेना घडवली. त्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो. कारण त्या वेळेला सगळंच काही निवळलं होतं. त्यावेळेला तुम्ही आलात. ज्या हिंमतीने तुम्ही आलात..' 

'ज्या लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं. सगळे तुमच्यावर धावून आले होते. त्यावेळेला तुम्ही तोंड दिलं आणि त्यातून तुम्ही यशस्वी झालात. आणखी यशस्वी व्हाल. हा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे... मी तुम्हाला आशीर्वाद देते की, शतायुषी व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य करत राहिल्याने कोणीही, कधीही संपत नाही.' अशा शब्दा आशा भोसले यांनी एकनाथ शिंदेंची स्तुती केली.

हे ही वाचा>> Sanjay Shirsat: सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय शिरसाट 'हे' काय बोलून गेले

...अन् रश्मी ठाकरे संतापल्या!

दरम्यान, आशा भोसले यांनी केलेल्या याच स्तुतीवर रश्मी ठाकरे या मात्र चांगल्याच संतापल्या असल्याचं समजतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आशा भोसलेंच्या या उद्गारांमुळे रश्मी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आगे. यावेळी त्यांनी केवळ संताप व्यक्त केलेला नाही तर रश्मी ठाकरेंनी या संदर्भातली नाराजीही व्यक्त केली आणि मध्यस्थांच्या माध्यमातून त्यांनी आशा भोसले यांच्यापर्यंत पोहचवली असल्याचं बोललं जात आहे.
 
आशा भोसले यांच्याशी कौटुंबिक संबंध असूनही बाळासाहेबांनंतरची खरी शिवसेना उभारण्याचं श्रेय त्यांनी एकनाथ शिंदेंना दिल्यामुळे ठाकरे कुटुंबीय हे व्यथित झालं असून त्यातूनच त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp