कल्याण: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका त्यांच्याच पक्षातील एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील अहिल्याबाई चौक परिसरात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे शिंदे गटातच काही आलबेल नसल्याचं आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचं नाव मोहन उगले असे आहे. तर मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्तीचं नाव राणी कपोते असे आहे. काल (23 मार्च) काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी श्रेय घेण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. ज्यानंतर आज (24 मार्च) राणी कपोते यांनी मोहन उगलेंना मारहाण केल्याचं समोर आलं.
हे ही वाचा>> "तुमच्यासारखे असे 56 पायाला बांधून फिरते" विधानपरिषदेत कडाडणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण?
काल रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा याच गोष्टीवरून मोहन उगले यांना जाब विचारण्यासाठी राणी कपोते या कल्याणमधील अहिल्याबाई चौकात आल्या होत्या. इथे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. ज्यानंतर राणी कपोते यांनी मोहन उगलेंना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा>> Nirmala Nawale: पुण्याच्या सरपंच बाई का होतायेत एवढ्या ट्रोल, 'रेंज रोव्हर' घेऊन फिरणाऱ्या निर्मला नवले आहेत तरी कोण?
दरम्यान, यावरून तणाव निर्माण झाल्यामुळे शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की करत मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावेळी, राणी कपोते यांनी असाही आरोप केला की, मारहाण सुरू असतानाच मोहन उगले यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने हात लावला. ज्यामुळे तिला संताप अनावर झाला.
दरम्यान, आता या मारहाणीचा व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल झाला आहे. राणी कपोते या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. याप्रकरणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कायद्याने महिलांना संरक्षण आहे. आत्तापर्यंत त्या महिलेला आम्ही काहीच बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही मात्र, पक्षाने अशा लोकांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी मोहन उगले यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
