प्रणिती शिंदेंचं 'ते' पत्र... भाजपच्या राम सातपुतेंना पहिलाच डाव पडणार भारी?

रोहिणी ठोंबरे

25 Mar 2024 (अपडेटेड: 25 Mar 2024, 01:40 PM)

Praniti Shinde On Ram Satpute : सोलापूर (Solapur) लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे.

Mumbaitak
follow google news

Praniti Shinde On Ram Satpute : सोलापूर (Solapur) लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे. सोशल मीडियावरून प्रणिती शिंदेंनी राम सातपुते यांना टोला लगावला आहे. (Solapur Seat Sharing Congress MLA Praniti Shinde On BJP MLA Ram Satpute her letter Viral on Social media)

हे वाचलं का?

प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान आगामी काळात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये ट्विटरवर वॉर रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

'सोलापूरची लेक कायमच तुमचं स्वागत करते'- प्रणिती शिंदेंचा टोला

'सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक,सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते,' अशा शब्दात राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

'समाजाचा एकत्रित विकास करण्यासाठी लढू'

ट्विटरवर बोलताना प्रणिती शिंदें असे ही म्हणाल्या, 'पुढील 40 दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू,' अशी टीकाही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे.

प्रणिती शिंदेंनी केले आवाहन

'आगामी लोकसभा निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवू या आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया', असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आवाहन केले आहे. प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे आता खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे. दरम्यान आगामी काळात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp