NCP : PM मोदींची पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी लगावला टोला, ”साहेबांना पद्मविभूषण…”

प्रशांत गोमाणे

• 08:00 AM • 27 Oct 2023

पंतप्रधान मोदी यांनी कृषीमंत्री असताना त्यांनी (शरद पवारांनी) शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल करत शरद पवारांचे नाव न घेता टीका केली होती. या टीकेवर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

supriya sule reply pm narendra modi after criticize sharad pawar shirdi nilwand dam canal

supriya sule reply pm narendra modi after criticize sharad pawar shirdi nilwand dam canal

follow google news

Supriya sule reply PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Pm Narendra Modi) गुरुवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि कालव्याचे लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृषीमंत्री असताना त्यांनी (शरद पवारांनी) शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल करत शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव न घेता टीका केली होती. या टीकेवर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. याच मोदी सरकाराने पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याचा मिश्किल टोला आता सुप्रिया सुळे यांनी मोदींना लगावला आहे. (supriya sule reply pm narendra modi after criticize sharad pawar shirdi nilwand dam canal)

हे वाचलं का?

नरेंद्र मोदींच्या पवारांवरील टीकेचा सवाल माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार अर्थातच पवार साहेबांवर… त्यांच स्वागत आहे. आपलं हेच एक नानं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतय. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी आलं तरी पवार साहेबांवर टीका केल्या शिवाय बातमी होत नाही, असा मिश्किल टीपण्णी त्यांनी केली. तसेच याच मोदी साहेबांच्या सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याचीही आठवण यावेळी सुप्रिया सुळेंनी करून दिली.

हे ही वाचा : Beed : ‘मुलगी दे नाहीतर कुटुंबच संपवेन’, भोंदू बाबाने गुप्तधानासाठी…

मराठा आरक्षणावर काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी यावेळी मराठा आरक्षणावर बोलताना महायुती सरकारवर टीका केली. सरकारला 40 दिवसांची डेडलाईन दिली होती. मला वाटलं यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी असेल, काहीतरी प्लान असेल. मग या ट्रिपल इंजिनच्या सरकारने 40 दिवसांचा मॅजिक नंबर आणला कुठून. मग परत जरांगेना आंदोलनाला बसावं लागलं म्हणजे आणखी एक ही जुमलेबाजी आहे. त्यामुळे मला वाटतं हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.माज असू द्या, या सगळ्यांची आरक्षणाची मागणी आहे. त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की, सगळ्या विरोधकांन तसेच मराठा, धनगर, मुस्लिम लिंगायतसाठी मीटिंगला बोलवा त्यानंतर पाच – दहा दिवसांचा स्पेशल अधिवेशन बोलवा. या अधिवेशनात चर्चा होऊ द्या आणि मग दिल्लीला प्रस्ताव पाठवा, यासाठी आमची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठा मुस्लिम धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकतीने कुठलेही सरकार असेल त्याच्याबरोबर उभी राहिल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

महाराष्ट्राचे एक ज्येष्ठे नेते केंद्र सरकारमध्ये अनेक वर्ष कुषीमंत्री राहिले आहेत. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचा सन्मानही करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल मोदी यांनी नाव न घेता शरद पवारांना केला आहे. तसेच सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांना फक्त एमएसपीवर साडे तीन लाख रूपये दिले. त्या तुलनेत आमच्या सरकारने 7 वर्षात साडे तेरा लाख कोटी रूपये शेतकऱ्यांना दिल्याचे मोदी यांनी सांगितले.

    follow whatsapp