मोठी बातमी... सुशांत सिंहची हत्या झाली नाही, CBI ने दाखल केला क्लोजर रिपोर्ट

1 सप्टेंबर 2020 रोजी, 'आज तक'ने सर्वप्रथम असे वृत्त दिले होते की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयला हत्येचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. आता ५ वर्षांनंतर, या बातमीवर सीबीआयने देखील शिक्कामोर्तब केलं आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:14 AM • 23 Mar 2025

follow google news

मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. पण आता सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. तपासादरम्यान सीबीआयला हत्येचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. 5 वर्षांपूर्वी 'आज तक' ने या प्रकरणाबाबत म्हटले होते की, त्यात हत्येचा कोणताही पुरावा नाही आणि आता सीबीआयनेही याची पुष्टी केली आहे.

हे वाचलं का?

जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली  होती. त्यानंतर पुढील काही महिने या प्रकरणाने अवघ्या देशात राळ उठवली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घेतले आणि अनेक वर्षे तपास सुरू ठेवला. 1 सप्टेंबर 2020 रोजी, आज तकने सर्वप्रथम बातमी दिली की, सुशांत सिंह राजपूत हत्येचा कोणताही पुरावा नाही.

हे ही वाचा>> 'दिशावर गँगरेप अन्...' आदित्य ठाकरेंसह 5 जणांची नावं, खळबळ उडवून देणारी दिशाच्या वडिलांची याचिका जशीच्या तशी

दरम्यान, असं असलं तरी सगळ्या शक्यता तपासून पाहण्यासाठी सीबीआय हत्येच्या दृष्टिकोनातून तपास करत होती. हा तपास तब्बल 5 वर्षे सुरू राहिला. अखेर आता या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

या प्रकरणात असे काहीही आढळले नाही जे सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचे सिद्ध करू शकेल. यासोबतच अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली आहे. 1 सप्टेंबर 2020 रोजी, आज तकने सर्वप्रथम वृत्त दिले होते की सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयला हत्येचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. आता ५ वर्षांनंतर, 'आज तक'च्या या बातमीला सीबीआयने दुजोरा दिला आहे.

काय होते प्रकरण?

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत हा त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. आपल्या बेडरुममध्ये तो पंख्याला गळाफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती आणि प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांपासून सीबीआयपर्यंत पोहोचला.

हे ही वाचा>> दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर नेमके कोणते आरोप?

मुंबईतील कूपर रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण एस्फिक्सिया  (श्वास रोखणे) असे सांगण्यात आले. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पटना येथे या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला होता. 

याला उत्तर म्हणून, रिया चक्रवर्तीने मुंबईत प्रति-तक्रार दाखल केली आणि सुशांतच्या बहिणींवर बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन घेतल्याचा आरोप केला होता.

कुटुंबीयांची प्रतिक्रिया

केके सिंग यांनी गेल्या महिन्यात, त्यांचा मुलगा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित जनहित याचिकेवर (पीआयएल) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नवीन सरकारकडून न्यायाची आशा व्यक्त केली होती. केके सिंह बऱ्याच काळापासून म्हणत आहेत की, सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे होऊ शकत नाही, त्यांनी सीबीआय तपासावर निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, तपास यंत्रणेने आपले काम वेळेवर केले नाही.

    follow whatsapp