Chhagan Bhujbal Vijay Wadettiwar : विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. यात छगन भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली. भुजबळांनी मांडलेल्या भूमिकेचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. भुजबळांच्या भाषणातील मुद्द्यांवर बोट ठेवत वडेट्टीवारांनी भुजबळांना सुनावलं.
ADVERTISEMENT
विधानसभेत विजय वडेट्टीवार भुजबळांबद्दल काय बोलले?
“काल बोलले भुजबळ. भुजबळांना थोडं समजायला पाहिजे. तिकडे बसून न्याय निवाडा करायचा. महाराष्ट्रापुढे सांगायचं छाती फोडून. आता तर ते काढायचंच राहिलं. आतमध्ये काय निघतं काही दिवसांनी समजेल. अशी फाडा आणि बघा माझ्या छातीत काय दडलं आहे. काही दिवसांनी दिसेल. पण, ते चाललंय पुढे काय दिसणार… कुणाची छबी दिसेल. आम्ही वाट पाहतोय”, असा टोला वडेट्टीवारांनी भुजबळांना लगावला.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरे-PM मोदी आज एकत्र असते, पण राऊतांनी शरद पवारांना…”
“तिथे बसून (सत्ताधारी बाकावर). आम्ही तिथे होतो. कोरोना काळाता सात महिने काम करायला मिळालं. तुम्ही पण काही चांगले निर्णय घेतले. त्यावेळी हे महोदय अजिबात बोलत नव्हते. शांत होते. काहीच करत नव्हते. मी राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रभर धडपडत होतो. मी सांगितलं मला पर्वा नाही. आज मात्र काय मिळत नाही”, अशा शब्दात वडेट्टीवारांनी भुजबळांना सुनावले.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “काय बोलले भाषणात? भाषण वाचून दाखवू… सारथी, बार्टीसारखे ओबीसींचे प्रश्न सोडवा. हे खरं आहे. बोललेत, पण इथे बोलून काय… सावे साहेब, तुमच्या कानात सांगायला पाहिजे. जोराने बोलता येत नाही, तर हळू बोला. हे जमवा ना, करा ना. सारथीला पैसे दिले, तुम्ही आम्हाला देत नाही. महाज्योतीला देत नाही.”
हेही वाचा >> अरे हxxxx, तुझ्या xxxxx… राजेश टोपेंना शिवीगाळ, बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप Viral
“महाज्योतीमध्ये कोण… कुणबी-मराठा. मराठा कुणबीच आहेत. सगळेच आहेत. 28 कोटी त्यांनीच मागितले. हे आरोप कुणाचे आहेत भुजबळांचे. अरे भुजबळ साहेब, तुम्ही आरोप करताहेत. जे मिळवायचा अधिकार तुम्हाला दिला आहे. तुम्ही तो अधिकार मिळवा नाहीतर खुर्चीला लाथ मारा. हिंमत दाखवा. तिथेच राहायचं. तिथेच बोलायचं. तिथेच खायचं. तिथेच चिडायचं. तिथेच मारायचं. तिथेच मरायचं. ही कुठली भूमिका आहे. याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे”, असे म्हणत वडेट्टीवारांनी भुजबळांना धारेवर धरलं.
सोंगाडेपणा कशाला पाहिजे…? वडेट्टीवारांचा भुजबळांना सवाल
“कुणाचा पाठिंबा आहे. चांगलं आहे. भलं होतं असेल. क्लिन. आनंद आहे. होऊदे क्लिन चिट. जेव्हढ्यांना द्यायची तेव्हढ्यांना द्या. सर्वांना सारखा न्याय द्या ही आमची भूमिका असं त्यांनी म्हटलं आहे. सारथी इतके पैसे महाज्योतीला द्या. मागण्याचा माझा अधिकार आहे, कारण मी विरोधक आहे. पण, त्यांचा (भुजबळ) तिथे मागायचा अधिकार नाही ना. त्यांचा मिळवायचा आहे. त्यांनी दिलं पाहिजे ना, पण ते मागत बसलेत. कटोरा हात मैं लेकर… दे बाबा के नाम दे, भगवान के नाम दे. कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण देत असताना मराठ्यांना द्या. ओबीसींच्या हक्काचं काढून घेऊ नका”, अशा शब्दात वडेट्टीवारांनी छगन भुजबळांनी केलेल्या भाषणाचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT