Meera Borwankar: मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला 2015 साली फाशी देण्यात आली होती. त्या याकूब मेमनच्या फाशीवरुनही मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. याकूब मेमन (Yakub Memon) हा मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी होता. त्याला फाशीची शिक्षाही देण्यात आली होती. मात्र त्याच्या मुलीने ज्यावेळी पासपोर्टसाठी अर्ज (Application for passport) केला होता. त्यावेळी माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मदत केली होती.
ADVERTISEMENT
बेकायदेशीर गोष्टींवर बोट
त्यावर बोलताना त्यांनी कायदेशीर आणि बेकायदेशीर गोष्टींवर बोट ठेवत त्यांनी बाप आरोपी असला तरी त्याची शिक्षा त्यांच्या मुलांना का असा सवाल करुन तिला पासपोर्ट मिळणं हा तिचा अधिकार असल्याचे मीरा बोरवणकर यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
हे ही वाचा >>‘तुला एक दिवस चांगलाच धडा शिकवीन’, अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का भडकले होता
पासपोर्ट मिळणं हा नैतिक अधिकार
माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणक या ज्यावेळी तुरुंग अधीक्षक होत्या त्यावेळी त्यांच्या कार्यकाळात अजमल कसाब आणि याकूब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की, याकूब मेमनच्या मुलीने ज्यावेळी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यावेळी तिला अडचणी आल्या होत्या. मात्र तिला पासपोर्ट मिळणं हा तिचा नैतिक अधिकार होता. त्यामुळे मी तिला मदत केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पासपोर्ट न्यायालय देईल
मीरा बोरवणकर याकूब मेमनच्या मुलीविषयी बोलताना म्हणाल्या की, तिला पासपोर्ट मिळणं हा तिचा नैतिक अधिकार आहे. मात्र ज्या पातळीवर तिला पासपोर्ट नाकारला होता. त्याच वेळी मी सांगितले होते की, जरी येथील प्रशासनाने तिला पासपोर्ट नाकारला असला तरी तिला तिचा पासपोर्ट न्यायालय मिळवून देईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी त्यावेळीही आणि आता मांडली आहे.
राजकीय हस्तक्षेप
अजमल कसाब आणि याकूब मेमनला ज्या काळात फाशी देण्यात आली होती. त्या काळातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्या काळातील राजकीय नेतृत्वानी या आरोपींना फाशी देताना हे अगदी गुपित ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्याच प्रमाणे ही दोन्ही प्रकरणं गुपित ठेवूनच या दोन्ही आरोपींना फाशी देण्यात आल्याचेही मीरा बोरवणकर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT