टी-20 विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये टीम इंडियाची निराशा झाली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या टी-20 मालिकेत भारताने अप्रतिम खेळ दाखवत मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मिशन टी-20 विश्वचषकापूर्वी, सध्याच्या विश्वविजेत्याविरुद्ध भारताचा विजय मनोबल वाढविण्याचे काम करेल. विश्वचषकापूर्वी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत टीम इंडियासाठी अनेक आनंदाच्या बातम्याही आल्या आहेत.
ADVERTISEMENT
वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने शेवटच्या षटकात विजय मिळवला. यासह भारताने 3 सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे. टीम इंडिया टी-20 मध्ये नंबर 1 टीम आहे, तर ऑस्ट्रेलिया सध्या टी-20 चा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्यामुळेच साऱ्या जगाच्या नजरा तिन्ही सामन्यांवर लागल्या होत्या.
पहिला सामना: ऑस्ट्रेलिया 4 विकेटने जिंकला
दुसरा सामना: भारत 6 विकेटने जिंकला (8-8 षटकांचा सामना)
तिसरा सामना: भारताने 6 विकेटने जिंकला
विराट कोहली, रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतले
टीम इंडियाने या मालिकेतून बरेच काही साध्य केले आहे, ज्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराट कोहलीचे पुनरागमन आणि रोहित शर्मा फॉर्मात आले आहे. विराट कोहलीने 3 सामन्यांच्या मालिकेत 76 धावा केल्या, ज्यात शेवटच्या सामन्यात 63 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने 3 सामन्यात 74 धावा केल्या, त्यात नागपूरच्या सामन्यातील नाबाद 46 धावांचा समावेश आहे.
रवींद्र जडेजाचा पर्याय मिळाला
आशिया चषक स्पर्धेत रवींद्र जडेजा जखमी झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो टी-20 विश्वचषकातूनही बाहेर पडल्याने अक्षर पटेलला संघात आणण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही अक्षरला संधी मिळाली आणि त्याने आपल्या फिरकीच्या जादूने सर्वांना चकित केले. अक्षरकडे चार षटके टाकण्याची, तसेच बॅटिंग करण्याची क्षमता आहे. अक्षरने या 3 सामन्यांच्या मालिकेत 8 विकेट्स घेतल्या आहे. आगामी भारत दक्षिण आफ्रिकेसोबत टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
पाकिस्तानचा विक्रम भारताने मोडला
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकाही जिंकून मोठा विक्रम केला आहे. या वर्षात आतापर्यंत 21 सामने जिंकून एका वर्षात टी-20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. टीम इंडियाने 2022 मध्ये 28 टी-20 सामने खेळले आहेत, त्यापैकी 21 जिंकले आहेत. 2021 मध्ये पाकिस्तानने 20 विजयांचा विक्रम केला होता.
ADVERTISEMENT