ADVERTISEMENT
४ टेस्ट मॅचची सिरीज ३-१ ने गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ आजपासून टी-२० सिरीज खेळण्यासाठी सज्ज झालाय. नरेंद्र मोदी मैदानाच्या इनडोअर प्रॅक्टीस सेंटरमध्ये इंग्लंडचे प्लेअर्स जोरदार सराव करताना दिसले.
टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या बॅट्समननी भारतासमोर शरणागती पत्करली तरीही टी-२० मध्ये इंग्लंडचा संघ भारतासमोर तगडं आव्हान निर्माण करु शकतो.
इंग्लंडचा कोचिंग स्टाफही आपल्या प्लेअर्सची स्किल सुधारण्यावर भर देत आहेत.
जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान अशी ओळख मिळालेल्या नरेंद्र मोदी मैदानावर जेव्हा दोन्ही टीम्सचचे बॅट्समन सिक्स-फोरची आतिषबाजी करतील त्यावेळी ही फटकेबाजी पाहणं सर्व फॅन्ससाठी आनंदाची गोष्ट असणार आहे.
वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून ही ५ टी-२० सामन्यांची सिरीज दोन्ही टीम्ससाठी महत्वाची असणार आहे.
५ टी-२० सिरीजची मालिका खेळल्यानंतर दोन्ही संघ पुण्याच्या गहुंजे मैदानावर ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळतील. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती पाहता पुण्यातही वन-डे सामन्यांची सिरीज ही प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे.
ADVERTISEMENT