कुलदीपची प्रशंसा अश्विनच्या जिव्हारी लागली असेल, तर मला आनंदच; रवि शास्त्रींनी सोडलं मौन

मुंबई तक

• 04:47 AM • 24 Dec 2021

फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अलिकडेच एका मुलाखतीत माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी कुलदीप यादवबद्दल केलेल्या विधानावरून भाष्य केलं होतं. अश्विनने केलेल्या त्या विधानाबद्दल रवि शास्त्री यांनी मौन सोडत भूमिका मांडली आहे. कुलदीपची प्रशंसा अश्विनच्या जिव्हारी लागली असेल, तर त्याचा मला आनंदच आहे, असं म्हणत शास्त्री या प्रकरणावर परखड भाष्य केलं आहे. रवि शास्त्री यांनी इंडियन […]

Mumbaitak
follow google news

फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अलिकडेच एका मुलाखतीत माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी कुलदीप यादवबद्दल केलेल्या विधानावरून भाष्य केलं होतं. अश्विनने केलेल्या त्या विधानाबद्दल रवि शास्त्री यांनी मौन सोडत भूमिका मांडली आहे. कुलदीपची प्रशंसा अश्विनच्या जिव्हारी लागली असेल, तर त्याचा मला आनंदच आहे, असं म्हणत शास्त्री या प्रकरणावर परखड भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

रवि शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आर. अश्विनने मांडलेल्या भूमिकेवर उत्तर दिलं. रवि शास्त्री म्हणाले, ‘अश्विन सिडनी कसोटी सामन्यात खेळला नाही आणि कुलदीपने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे मी कुलदीपला संधी देणं अगदीच योग्य ठरतं. त्यामुळे जर अश्विन दुखावला असेल, तर मला आनंदच आहे. कारण यामुळे त्याला काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रेरित केलं. प्रत्येक टोस्टवर लोणी लावणं माझं काम नाही. माझं काम वस्तुस्थिती सांगणं आहे’, असं रवि शास्त्री म्हणाले.

याच मुद्द्यावर पुढे बोलताना रवि शास्त्री म्हणाले, ‘जर तुमचा प्रशिक्षक तुम्हाला आव्हान देत असेल, तर तुम्ही काय कराल? रडत रडत घरी जाल आणि मी परत जाणार नाही, असं स्वतः सांगाल का? मी एक खेळाडू म्हणून या गोष्टीला आव्हान म्हणून स्वीकारेल. जेणेकरून प्रशिक्षकाचं मत चुकीचं ठरेल. जर कुलदीपबद्दल मी केलेली प्रशंसा अश्विनच्या जिव्हारी लागली असेल, तर मी ते विधान केल्याचा मला आनंदच आहे. त्यामुळे त्याला (अश्विन) काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रेरित केलं’, अशी भूमिका शास्त्री यांनी मांडली.

रविचंद्रन अश्विन काय म्हणाला होता?

रविचंद्रन अश्विनने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शास्त्री यांच्या विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘मी रवि शास्त्रींचा खूप आदर करतो. मात्र त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं. सहकाऱ्यांच्या यशाचा आनंद साजरा करणे किती महत्त्वाचं आहे, याबद्दल आम्ही बोलत असतो. मी कुलदीपसाठी आनंदी होतो. मी पाच गडी बाद करू शकलो नाही, मात्र त्याने ऑस्ट्रेलियात पाच बळी घेतले. मी चांगली गोलंदाजी करूनही पाच गडी बाद करू शकलो नाही,’ असं अश्विन म्हणाला होता.

2019मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये कसोटी सामना झाला होता. या सामन्यात कुलदीप यादवने चमकदार कामगिरी करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. भेदक गोलंदाजी करत कुलदीप यादवने पाच बळी घेतले होते. या कामगिरीनंतर रवि शास्त्री यांनी कुलदीप यादव भारताचा परदेशातील पहिल्या क्रमांकाचा फिरकी गोलंदाज असल्याचं म्हटलं होतं.

    follow whatsapp