ADVERTISEMENT
गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जचा यंदाच्या हंगामातली कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे.
रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSK ला यंदाच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महेंद्रसिंह धोनीने यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कॅप्टन्सी न करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या यंदाच्या कामगिरीवर रवी शास्त्री यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
चेन्नईने फाफ डु-प्लेसिसला ऑक्शनमध्ये जाऊ द्यायला नको होतं. रविंद्र जाडेजाने त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करायला हवं होतं…असं रवी शास्त्री म्हणाले.
“डु-प्लेसिस हा मॅचविनर खेळाडू आहे. तो चांगला खेळ करतो त्यामुळे चेन्नईने डु-प्लेसिसला राखून ठेवायला हवं होतं.”
जर धोनीला कॅप्टन्सी करायची नव्हती तर फाफ कॅप्टन्सीसाठी चांगला उमेदवार होता. रविंद्र जाडेजा दबावाखाली नसेल तर तो खूप चांगला खेळ करतो, असं रवी शास्त्री ESPNCricinfo ला म्हणाले
धोनी यंदाच्या हंगामात कॅप्टन नसल्याचा चेन्नईला आतापर्यंत खूप मोठा फटका बसला आहे.
तुम्ही रवी शास्त्री यांच्या या मताशी सहमत आहात का? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT