शुक्रवारी MS Dhoni चं ट्विटर अकाऊंट चर्चेत आलं होतं कारण होतं अकाऊंटवरून गायब झालेली ब्लू टिक. केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात जो वाद झाला त्यानंतर ट्विटरने अनेक राजकीय नेते, दिग्गज यांच्या अकाऊंटवरून ब्लू टिक काढली होती. ट्विटर ब्लू टिक म्हणजे अकाऊंट व्हेरिफाईड असल्याची खूण आहे. हीच खूण महेंद्र सिंग धोनीच्या अकाऊंटवरूनही काढण्यात आली. त्यामुळे हे का झालं असावं याची चर्चा रंगली होती. आता ही ब्लू टिक त्याच्या अकाऊंटवर परत आली आहे.
ADVERTISEMENT
शुक्रवारी दुपारी ही ट्विटरने ब्लू टिक काढून टाकली होती. त्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं होतं. धोनीच्या चाहत्यांनी धोनीला ब्लू टिक का गायब झाली ते विचारण्यासही सुरूवात केली होती. महेंद्र सिंग धोनी हा ट्विटर तसा कमी अॅक्टिव्ह असतो म्हणून ही ब्लू टिक काढली असावी असाही अंदाज शेकडो नेटकऱ्यांनी वर्तवला. मात्र आता धोनीला ट्विटरने ही ब्लू टिक परत केली आहे.
मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर हँडलवरील व्हेरीफिकेशन मार्क म्हणजेच ब्लू टिक काढून घेतली होती. यापूर्वीही ट्विटरने अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक काढून घेतली आहे. काही काळानंतर ब्लू टिक पुन्हा पूर्वरत करण्यात आली आहे.
काय असू शकतं कारण?
गेल्या काही दिवसांपासून ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटने त्यांच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानुसार प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक काढून घेण्यात आली होती. महेंद्र सिंग धोनीचं अकाऊंट सध्या सक्रिय असल्याचं दिसत नाही धोनीच्या अकाऊंटवर शेवटचं ट्विट जानेवारी महिन्यात पडलं आहे. या ट्विटमध्ये त्याने स्ट्रॉबेरीची शेती करतानाचा आणि स्ट्रॉबेरी खात असतानाचा फोटो, व्हीडिओ पोस्ट केला आहे. हा व्हीडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्याची लिंक ट्विटरवर शेअर करण्यात आली होती. धोनीचे सध्या 8.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र धोनी 33 जणांना फॉलो करतो आहे. तो फार सक्रिय नव्हता त्यामुळे ब्लू टिक काढली गेली असावी असा अंदाज वर्तवला जातो आहे.
मागच्याच महिन्यात ट्विटरने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर खात्यावरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली. ट्विटरने म्हटले आहे की, मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील त्यांच्या हँडलचे नाव बदलणं हे ब्लू टिक काढून टाकण्यामागचे कारण असू शकते. ट्विटरवर नेत्याची ब्लू टिक काढून टाकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्यातून निळी टिक काढून टाकली होती.
ADVERTISEMENT