Tokyo Olympic : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा, ७-१ च्या फरकाने केला पराभव

मुंबई तक

• 12:18 PM • 25 Jul 2021

न्यूझीलंडवर मात करुन टोकियो ऑलिम्पिकची दिमाखात सुरुवात करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं पितळ दुसऱ्याच सामन्यात उघडं पडलं आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला ७-१ च्या फरकाने हरवलं आहे. दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने ५ मिनीटांत ३ गोल स्विकारले. संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखलं. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारताला पहिल्यांदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली होती. […]

Mumbaitak
follow google news

न्यूझीलंडवर मात करुन टोकियो ऑलिम्पिकची दिमाखात सुरुवात करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं पितळ दुसऱ्याच सामन्यात उघडं पडलं आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला ७-१ च्या फरकाने हरवलं आहे. दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने ५ मिनीटांत ३ गोल स्विकारले. संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखलं.

हे वाचलं का?

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारताला पहिल्यांदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतू हरमनप्रीतने ही संधी वाया घालवली. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नरच्या संधी चालून आल्या. त्यातील एका संधीवर गोल करत ऑस्ट्रेलियाच्या डॅनिअल बेलने गोल करत कांगारुंना १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पहिल्या सत्रात भारताला गोल करण्याच्या संधी आल्या परंतू ऑस्ट्रेलियाचा बचाव भेदणं भारताच्या खेळाडूंना जमलं नाही.

दुसऱ्या सत्रापासून ऑस्ट्रेलियाने सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. भारताच्या कमकुवत बचावफळीचा फायदा उचलत ऑस्ट्रेलियाने भारताच्या गोलपोस्टवर हल्ले चढवले. पी.आर.श्रीजेशने बचावाचा प्रयत्न केला, परंतू त्याचे प्रयत्न फोल ठरले. जेरेमी हेवार्ड, फ्लायन ओग्लिव्ह आणि जोशवा बेलेट्झ यांनी गोल झळकावत ऑस्ट्रेलियाची आघाडी आणखी मजबूत केली.

तिसऱ्या सत्रात भारताने चांगली सुरुवात केली. या सत्रातही भारताला पेनल्टी कॉर्नरवर संधी मिळाली होती. परंतू शॉट घेताना व्हेरिएशन करण्याच्या नादात भारतीय ड्रॅगफ्लिकर्सनी ही संधी वाया घालवली. दिलप्रीत सिंगने ३४ व्या मिनीटाला एक सुरेख मैदानी गोल करत भारताला दिलासा दिला. परंतू संपूर्ण सामन्यात भारताचा हा एकमेव गोल ठरला. ऑस्ट्रेलियाचा झंजावात यानंतरही सुरुच राहिला.

भारताने पहिला गोल झळकावल्यानंतर सहा मिनीटांनी ऑस्ट्रेलियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, ज्यावर ब्लेक गोव्हर्सने गोल करत भारताला आणखी पिछाडीवर ढकललं. यानंतर गोव्हर्सने पेनल्टी कॉर्नवर आणखी एक गोल करत भारताच्या आक्रमणातली उरली सुरली सर्व हवा काढून टाकली. टीम ब्रँडने ५४ व्या मिनीटाला ऑस्ट्रेलियाचा सातवा गोल झळकावत भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं.

Tokyo Olympic : तांत्रिक बिघाडामुळे भारताने गमावलं एक पदक, पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलात बिघाड

    follow whatsapp