Women’s premier league WPL 2023: महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला हंगाम आजपासून (4 मार्च) धमाकेदारपणे सुरू होत आहे. त्यामुळे महिला क्रिकेटचे नवे पर्वही सुरु होणार आहे. विशेषत: आयपीएलप्रमाणेच (IPL) भारतीय महिला संघाला या लीगचा अधिक फायदा होणार आहे. Today’s beginning women primer league
ADVERTISEMENT
WPL: Gujarat Giants ने ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटरला बनवलं आपलं कर्णधार!
महिला प्रीमियर लीगमधील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. मुंबई संघाचे नेतृत्व भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर करणार आहे, तर गुजरातची कमान यष्टिरक्षक बेथ मुनीकडे आहे.
अनेक खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी
WPL च्या माध्यमातून आता महिला खेळाडूंना त्यांचा खेळ पुढील स्तरावर नेण्याची उत्तम संधी मिळणार आहे. प्रत्येकाला वेगळा अनुभवही मिळणार आहे. यासह मोठा पैसा आणि ग्लॅमरचा आनंद घेण्याची संधी मिळेल. ही स्पर्धा स्नेहा दीप्ती आणि जसिया अख्तर या दिग्गज आणि प्रस्थापित खेळाडूंसह असेल. स्नेहाला हे सिद्ध करायचे आहे की आई झाल्यानंतरही तिची खेळाची आवड कमी झालेली नाही. तर जम्मू-काश्मीर जसिया मोठे फटके मारण्यासाठी ओळखली जाते. तिला या स्पर्धेतून उमरान मलिकसारखी प्रसिद्धी मिळवायची आहे.
वरिष्ठ खेळाडूंनाही वेगळा अनुभव मिळेल
हरमनप्रीत, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि शेफाली वर्मा या लीगमधून सामने जिंकण्याचे कौशल्य मिळवू शकतात. या खेळाडूंनी सजलेला भारतीय संघ जागतिक स्पर्धांच्या मोठ्या सामन्यांमध्ये झगडत आहे. या टी-20 लीगची खूप प्रतीक्षा होती. यात एकूण पाच संघ आणि 87 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या खेळाडूला जगातील दिग्गजांशी खेळण्याची आणि ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळेल. एकूण 4,669 कोटी रुपयांना पाच फ्रँचायझी संघ विकले गेल्याने WPL ने क्रिकेट जगतात खळबळ माजवली आहे. यामध्ये अदानी समूहाने गुजरात फ्रँचायझी 1,289 कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
Smriti Mandhana, WPL : महाराष्ट्राची लेक झाली RCB ची कर्णधार
हरमनच्या संघात स्टार खेळाडू आहेत
हरमनप्रीतसोबत या संघात इंग्लंडचा नॅट स्कायव्हर-ब्रंट आणि वेगवान गोलंदाज इस्सी वोंग, न्यूझीलंडची अमेलिया केर, दक्षिण आफ्रिकेची टी-20 विश्वचषक फायनलमधील क्लो ट्रायॉन, वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूज आणि ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज हीदर ग्रॅहम यांचा समावेश आहे.
सर्वाधिक 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या हरमनप्रीतला आशा आहे की ही स्पर्धा भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दरी कमी करण्यात यशस्वी होईल. चॅम्पियन ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मुनीच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्समध्ये भारतीय स्टार्स हरलीन देओल, स्नेह राणा (उपकर्णधार) आणि अनुभवी सुषमा वर्मा यांचा समावेश आहे.
गुजरातचा संघही कमी नाही
त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियाचे T20 विश्वचषक विजेते, अॅश गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅम, वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि इंग्लंडची सोफिया डंकले यांसारखे परदेशी दिग्गज आहेत. भारताची माजी कर्णधार मिताली राजही संघाची मार्गदर्शक आणि सल्लागार आहे.
यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाची आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज अॅलिसा हिलीला कर्णधार बनवले आहे. रँचायझीने दीप्तीसाठी 2.6 कोटी रुपयांची बोली लावली होती. ती दुसरी सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अनुभवी मेग लॅनिंग करणार आहे, तर जेमिमा आणि शेफाली या संघात आक्रमक फलंदाज आहेत.
ADVERTISEMENT