सोलापुरात PM Modi च्या डोळ्यात पाणी, कंठ दाटला; म्हणाले, “लहानपणी…”
कुंभारीत रे नगर उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण मोदींनी केले. या कार्यक्रमात बोलताना मोदी भावूक झाले.
ADVERTISEMENT

PM Modi Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापूरपासून जवळच असलेल्या कुंभारीत रे नगर उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण मोदींनी केले. 15 हजार कुटुंबांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. या कार्यक्रमात बोलताना मोदी भावूक झाले.
सोलापूरमधील कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, “प्रभूरामाने आपल्याला दिलेल्या वचन पाळण्याची शिकवण दिली आहे. आम्हाला आनंद आहे की, सोलापुरातील हजारो गरिबांसाठी, मजुरांसाठी जो संकल्प केला होता, तो आज पूर्ण होतोय.”
“पीएम आवास योजनेतंर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण होत आहे. मी जाऊन बघून आलो आणि मलाही वाटलं की लहानपणी अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर…”, असं बोलल्यानंतर मोदी भावूक झाले.
हेही वाचा >> ‘लैच जहरी शब्द’, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांनाच केलं ट्रोल
PM Modi got emotional. pic.twitter.com/ySY0I90Osg
— News Arena India (@NewsArenaIndia) January 19, 2024
हीच माझी सर्वात मोठी कमाई -पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला. गहिवरलेल्या सूरात पंतप्रधान मोदी म्हणाले, “या गोष्टी बघतो, तेव्हा मनाला समाधान वाटतं. हजारो कुटुंबांची स्वप्न साकार होतात, तेव्हा त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी कमाई असते”, असे उद्गार मोदींनी यावेळी काढले.
हेही वाचा >> भाजपची ऑफर की काँग्रेसविरोधात रणनीती! शिंदेंच्या गौप्यस्फोटाचा अर्थ काय?
“या प्रकल्पाचे भूमिपूजन करायला आलो होतो, तेव्हा मी शब्द दिला होता की, चावी द्यायलाही मी स्वतः येईल. आज मोदींनी ही ग्यारंटी पूर्ण केली. मोदीची ग्यारंटी म्हणजे ग्यारंटी पूर्ण होण्याची संपूर्ण ग्यारंटी”, असे मोदी म्हणाले.