Pune : स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा अंत, खेळायला सोडून गेले होते आजोबा...
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "सोसायटीतील रहिवाशांनी आम्हाला सांगितलं की, यश तलावाजवळील एका मोकळ्या जागेत सोसायटीतील काही इतर मुलांसोबत खेळत होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील नांदेड सिटीमध्ये घडली हृदयद्रावक घटना

चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून अंत

नेमकी कशी घडली घटना? पोलीस काय म्हणाले?
Pune News : पुण्यातील धायरीमध्ये असलेल्या पार्क व्ह्यू हाऊसिंग सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास स्विमिंग पूलच्या पाण्यात पडून एका सहा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. 18 आणि 13 मजल्यांच्या दोन बहुमजली इमारती असलेल्या या सोसायटीमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि इतर सुविधांसह एकूण 366 फ्लॅट आहेत. तिथेच ही घटना घडली.
हे ही वाचा >> Holi 2025 : 'या' 5 लोकांनी होळीच्या रंगांपासून राहा दूर, नाही तर होईल रंगाचा बेरंग
नांदेड सिटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश हर्षद गोसावी असं मृत मुलाचं नाव आहे. यश रविवारी त्याच्या पालकांसह उन्हाळी सुट्टीसाठी सोसायटीतील त्याच्या आजी-आजोबांच्या फ्लॅटवर आला होता. त्याचे वडील एका बँकेत काम करतात आणि खोपोलीमध्ये असतात. तर त्याची आई गृहिणी आहे. कुटुंब खोपोलीमध्ये भाड्याच्या घरात राहत होतं. खोपोलीमध्येच एका शाळेत यश दुसरीमध्ये शिकत होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
"मुलगा स्विमिंग पूलमध्ये कस पडला, याचा तपास आम्ही करत आहोत. सध्या तरी आम्ही अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून बेजबादारपणा झाला का, हे शोधण्यासाठी आम्ही संबंधित लोकांचे जबाब नोंदवू," असं वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितलं.
हे ही वाचा >> Palghar Crime : बेेवारस सुटकेस लहान मुलांनी उघडली, सुटकेसमध्ये जे सापडसलं ते पाहुन सगळेच हादरले
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "सोसायटीतील रहिवाशांनी आम्हाला सांगितलं की, यश तलावाजवळील एका मोकळ्या जागेत सोसायटीतील काही इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचे आजोबा ज्येष्ठ नागरिकांच्या केंद्रात होते. थोड्या वेळानंतर कुटुंबाला यश आजूबाजूला दिसत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सोसायटीच्या इतर सदस्यांसह शोध सुरू केला. अखेर रात्री 8:30 च्या सुमारास मुलगा तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसला. त्याला बाहेर काढलं आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात आणि नंतर मृत घोषित केल्यानंतर ससून जनरल रुग्णालयात नेण्यात आले."