Pune Crime : लघवी करण्याच्या कारणावरुन वाद झाला, टोळक्याचा जोडप्यावर कोयत्यानं हल्ला

मुंबई तक

गाड्यांची तोडफोड, कोयता गँगचा हैदोस, गुन्हेगारांचे हवाबाजी  करणारे रील्स...पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या थरारक घटना समोर येत आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या तरूणांकडून होत असलेल्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच आता ही एडी भाईची गँग समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील धायरीमध्ये जोडप्यावर कोयत्यानं हल्ला

point

लघवी करण्याच्या कारणावरुन झाला होता वाद

point

एडीची भाईची माणसं आहोत, म्हणत डोक्यात घाव घातला

Pune Crime News : पुण्यात रोज गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान असून, त्यात पोलिसांना फारसं यश येताना दिसत नाहीये. पुण्यातील धायरी भागात एक धक्कादायक घटना घडली. एका किरकोळ वादातून तीन तरुणांनी पती-पत्नीवर कोयत्यानं हल्ला केल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी केल्यावरुन झालेल्या वादानंतर समोरासमोर आल्यानंतर संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि तिच्या पतीलाही मारण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा >> Tushar Kharat : भाजप मंत्री जयकुमार गोरेंना बिनधास्त नडलेले पत्रकार तुषार थोरात कोण?

घटना कशी घडली? 

तक्रारदार महिला आणि तिचा पती शुक्रवारी संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर सिंहगड रोडवरील प्रादेशिक कार्यालयाजवळ बसले होते. त्याच वेळी तीन तरुण दुचाकीवरून आले. त्यापैकी एकाने तिथेच उभं राहून लघवी करण्यास सुरुवात केली.

महिलेच्या पतीने त्याला या कृत्याबद्दल विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याला पकडून धमक्या दिल्या. आम्ही एडी भाईचे लोक आहोत, आम्हाला थांबवणारे तुम्ही कोण? हा एरिआ आमच्या भाईचा आहे. आम्ही इथं लघवी करणार,  आम्ही तुम्हाला मारून टाकू." असं म्हणत शिवीगाळ सुरू केली.

हे ही वाचा >> Beed Crime: 'Walmik Karad ने एकदा नव्हे तर 6 वेळा...' धक्कादायक माहिती आली समोर, 'तो' जबाब जसाच्या तसा...

दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकानं महिलेच्या डोक्यात कोयत्यानं वार केले, तर दुसऱ्यानं तिच्या पतीवर हल्ला करून त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. गेल्या शुक्रवारी ही घटना समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp