Dawood Ibrahim च्या मुंबईतील नातेवाईकाची भरलग्नात गोळ्या झाडून हत्या

प्रशांत गोमाणे

Dawood Ibrahim Relataive Murder : निहाल हा एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला असताना त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने सध्या खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

dawood ibrahim relative shot dead uttar pradesh jalalabad shahajahapur nihal mumbai
मोस्ट वॉटेंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या जलालाबादमध्ये ही घटना घडली आहे.
social share
google news

Dawood Ibrahim Relataive Murder : मोस्ट वॉटेंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) जलालाबादमध्ये ही घटना घडली आहे. निहाल खान असे 35 वर्षीय दाऊदच्या नातेवाईकाचे नाव आहे. निहाल हा एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला असताना त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने सध्या खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस (Police) करीत आहेत.  (dawood ibrahim relative shot dead uttar pradesh jalalabad shahajahapur nihal mumbai)  

उत्तर प्रदेशच्या शाहजहापूर येथील पालिकाध्यक्ष असलेल्या शकील अहमदचा मुलगा रज्जाकचं लग्न सनासोबत ठरलं होतं. या लग्नासाठी कुटुंबातील अनेक लोक मुंबईवरून युपीच्या शाहजहापूरला आले होते. या लग्नात शकीलचा मेहुणा निहाल देखील आपल्या कुटुंबासह मुंबईहून शाहजहांपूरला पोहोचला होता. 

हे ही वाचा : Manoj jarange : खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप

बुधवारी सुलतानपूरमध्ये लग्नाचा कार्यक्रम होता. सगळी नातेवाईक मंडळी एकत्र जमली होती.  या दरम्यान अचानक लग्नात शकीलचा भाऊ कामीलने एन्ट्री घेतली. कामीलने लग्नात येऊन बंदूकीने गोळ्या झाडून निहालची हत्या केली. या हत्येनंतर कामीलने घटनास्थळावरून पळ काढला होता.

या घटनेनंतर निहालची पत्नी रुखसारने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून निहालचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या घटनेतील आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे. जुन्या वैमनस्यातून निहालची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

हे ही वाचा : पवारांचा एक फोन अन् बाळासाहेबांनी.. 'पंत' असे बनलेले CM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल मुंबईत राहत होता आणि तिथे कपड्यांचा व्यवसाय करायचा. 15 फेब्रुवारीला लग्न समारंभात सामील होण्यासाठी कुटुंबासह जलालाबादला तो पोहोचला होता. यावेळी लग्नसंमारंभात आरोपी कामीलने त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होता. या घटनेतील पीडित आणि आरोपी दोघेही दाऊदचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कामिलच्या कुटुंबातील महिला सदस्य निहालच्या कुटुंबातील एका सदस्याशी जवळीक साधली होती. याच कारणामुळे ही हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी कामीलचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती प्रभारी निरीक्षक हरपाल सिंह बालियान यांनी दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp