लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी खोलीत गेले, सकाळी कुटुंबानं दार तोडल्यावर दोघांचे मृतदेह सापडले... थरारक घटनेनं सगळे हादरलं
Ayodhya News: सकाळी कुटुंबानं दरवाजा उघडून पाहिल्यावर कळलं की, नववधूचा मृतदेह पलंगावर पडला होता, तर दुसरीकडे वराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हे पाहून कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नाच्या पहिल्या रात्री दोघेही मोठ्या आनंदात खोलीत गेले

सकाळी कुटुंबानं आवाज दिल्यावर दोघांनीही दार उघडलं नाही

दार तोडून आत गेल्यावर पाहिलं आणि कुटुंब हादरलं
Ayodhya News: उत्तर प्रदेशमधील अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 7 ला एका जोडप्याचा विवाह झाला होता. त्यानंतर सासरी मोठ्या थाटात वधूचं स्वागत केलं गेलं आणि नंतर दोघेही रात्री आपल्यात खोलीत गेले. पण सकाळ झाली तरी दोघेही खोलीतून बाहेर पडले नाहीत. आधी कुटुंबातल्या लोकांनी आवाज दिला. पण आतून काहीच उत्तर आलं नाही. त्यानंतर बराच वेळ झाल्यावर घरच्यांची चिंता वाढली आणि त्यांनी दार तोडलं. तेव्हा आतलं दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
हे ही वाचा >>बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत? कारण वाचून लोटपोट हसाल
सकाळी कुटुंबानं दरवाजा उघडून पाहिल्यावर कळलं की, नववधूचा मृतदेह पलंगावर पडला होता, तर दुसरीकडे वराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हे पाहून कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. लग्नाच्या रात्री दोघांचं काय झालं? हे अजूनही गूढच आहे.
कँटमधील सहादतगंजमध्ये ही घटना घडली आहे. इथे राहणाऱ्या प्रदीपचा शिवानीशी मार्च 2015 मध्ये विवाह झाला. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. 8 मार्चला सकाळी वधू सासरी आली आणि नववधूचं स्वागत करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी रिसेप्शनचीही तयारी झालेली होती. सर्वजण रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त होते. 8 मार्चच्या रात्री प्रदीप आणि शिवानी लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी आपल्या खोलीत गेले. मात्र 9 मार्च रोजी सकाळी दोघेही त्यांच्या खोलीतून बाहेर पडले नाहीत. दरवाजा तोडला असता वधूचा मृतदेह पलंगावर पडलेला होता, तर प्रदीपचा मृतदेह फाट्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
हे ही वाचा >>आरारारा खतरनाक! रेल्वे फाटक बंद झालं..चक्क बाईकच खांद्यावर उचलून पलीकडे गेला, बाहुबलीचा Video व्हायरल
हे पाहून कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. वधूपक्षाचे लोकही लगेच तिथे पोहोचले. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आणि दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.