टेन्शन घेऊच नका! गरोदरपणात उद्भवते केस गळतीची समस्या? ''या पद्धतीने करा Hair Fall कंट्रोल

मुंबई तक

Hair Fall Control Tips In Marathi : बदलती लाईफस्टाईल आणि धावपळीच्या जीवनामुळे अनेक लोकांना केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. ही समस्या गरोदरपणात जास्त जाणवते.

ADVERTISEMENT

Hair Fall Control In Pregnancy
Hair Fall Control In Pregnancy
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळेही केस गळतात

point

गरोदरपणात फॉलो करा सकस आहार

point

माइल्ड शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा

Hair Fall Control Tips In Marathi : बदलती लाईफस्टाईल आणि धावपळीच्या जीवनामुळे अनेक लोकांना केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. ही समस्या गरोदरपणात जास्त जाणवते. अनेक महिला या समस्येमुळं चिंतेत असतात. खरंतर गरोदरपणात केस गळणे एक सामान्य समस्या आहे. शरीरात होणारे अनेक प्रकारचे बदल आणि हार्मोन्समध्ये चढ-उतार झाल्याने अशाप्रकारची समस्या उद्धवते. 

पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळेही केस गळतात

गरोदरपणात केस गळण्याची समस्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकते. घरगुती उपाय आणि योग्य पद्धतींमुळे या समस्येवर मात करू शकता. जर गरोदरपणात तुमचेही केस गळत असतील, तर आम्ही तुम्हाला काही जबरदस्त टीप्स सांगणार आहोत. 

हे ही वाचा >> करूणा मुंडे आहेत तरी कोण? आतापर्यंत धनंजय मुंडेंना कसं आणलं अडचणीत.. पाहा A टू Z माहिती

गरोदरपणात घ्या सकस आहार

गर्भवती महिलेनं सकस आहार घेणं खूप आवश्यक असतं. तुम्ही डाळ, अंडी, हिरव्या भाज्या, दूध इ. पदार्थ आहारात समाविष्ट करू शकता. तसच केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमीन B, व्हिटॅमीन C, व्हिटॅमीन D आणि झिंक आवश्यक असतं. अशा पदार्थांनाही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये सामील करू शकता, ज्यामध्ये अशाप्रकारची पोषक तत्व असतात.

माइल्ड शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा

तुम्ही तुमच्या केसांना माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनर नक्कीच लावा. तुम्ही सल्फेट फ्री हर्बल शम्पूचाही वापर करू शकता. केसांना शॅम्पू लावल्यानंतर त्यांना जास्त वेळ रगडू नका. शॅम्पू लावल्यानंतर हलक्या हातांनी त्यांची मसाज करा.

हे ही वाचा >> खेळणं देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं, अत्याचार करुन चिमुकलीला संपवलं, मैत्रीणीने सगळं सांगितलं

केसांना लावा हे तेल

तुम्ही केसांना नियमितपणे तेल लावा. तुम्ही केसांमध्ये नारळाचं तेल, बदामाचं तेल किंवा आवळ्याचं तेल लावू शकता. तसच तुम्ही तुमच्या केसांना एक आठवड्यात कमीत कमी दोन-तीन वेळा मसाज करा. केसांना तेलाने मसाज केल्याने स्काल्पचं ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp