Maharashtra Weather: राज्यातील काही भागांत पावसाची विश्रांती; पण 'या' जिल्ह्यांना 'मुसळधार' इशारा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर आता कमी झाला आहे.

point

'या' जिल्ह्यांना 'मुसळधार' पावसाचा इशारा

point

मुंबई-पुणेकरांसाठी गुड न्यूज! वर्षभर पाण्याची चिंता मिटली

Maharashtra Weather Forecast : राज्याच्या विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार कोळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. मुंबई शहर आणि उपनगरात सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर भागांत आज (9 ऑगस्ट) हवामानाची स्थिती कशी असेल? सविस्तर जाणून घेऊयात. (Maharashtra weather Forecast live update news today 9th august 2024 rain alert in mumbai pune monsoon news marathi)
 

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर आता कमी झाला आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमधील कामांना वेग दिला पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे. फवारणीसारखी कामे या कालावधीत पूर्ण करून घ्यावीत असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. तसंच, काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Neeraj Chopra: 'खेल अभी बाकी है!' भारताच्या खात्यात 'रौप्य'; भालाफेकीत नीरज चोप्राचा मोठा पराक्रम! 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांना देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे सुद्धा काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुणे शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली होती.

हे वाचलं का?

मुंबई-पुणेकरांसाठी गुड न्यूज! वर्षभर पाण्याची चिंता मिटली

मुंबई शहर आणि उपनगरात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे.  

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana List 2024 PDF: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, कशी करणार PDF डाऊनलोड?

तसंच पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्नही आता मिटला आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 7.97 टीएमसी (93.64 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, भाटघर आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली असून या धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT