Maharashtra Weather: विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा... राज्यातील 'या' जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातल्याचे चित्र

point

'या' जिल्ह्यांना कोसळधार पावसाचा अंदाज!

point

IMD कडून 'या' भागांना महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather Update News : यंदा राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. अशावेळी धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. आजही (20 सप्टेंबर 2024) हवामान विभागाने  (IMD) काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत तुमच्या शहरात हवामानाचा अंदाज नेमका काय आहे? जाणून घेऊया... (maharashtra Weather Forecast report today 20 September 2024 IMD alert to these districts Mumbai Pune)

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहाणार असून, मधूनमधून मध्यम ते तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Tirupati Balaji: तिरूपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावराची चरबी, सदस्य मिलिंद नार्वेकर म्हणाले, 'मला तर...'

'या' जिल्ह्यांना कोसळधार पावसाचा अंदाज!

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi: नोकरी-व्यवसायात प्रचंड भरभराट! पण काहींचं या व्यक्तीशी होणार वाद...

IMD कडून 'या' भागांना महत्त्वाचा इशारा

संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार आहे. परभणी, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 21 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 23 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT