Tirupati Balaji : खळबळजनक, तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑईल... रिपोर्टच आला समोर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

tirupati prasad oil animal fat  cm chandrababu naidu allegation jagan reddy shocking news
तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी

point

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा आरोप

point

प्रसादाच्या तपासणीनंतर खळबळजनक रिपोर्ट समोर

Tirupati Balaji Prasad fish Oil : भारतातील जगप्रसिद्ध मंदिर असलेल्या तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी केला होता.नायडू यांच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे आणि राजकीय वातावरण देखील तापले आहे. तसेच नायडू यांच्या आरोपानंतर एक रिपोर्टही समोर आला आहे. या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.(tirupati prasad oil animal fat  cm chandrababu naidu allegation jagan reddy shocking news) 

तिरूपती बालाजी हे भारतातील जगप्रसिद्ध मंदिर असून विविध ठिकाणांहून अनेक लोक इथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या मंदिराचं व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे केलं जातं. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. याच लाडूच्या प्रसादाबाबत चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा केला आहे.

हे ही वाचा : समजून घ्या: उद्धव ठाकरेंच्या यांच्या केसला उशीर, Supreme Court तारखा ठरवतं तरी कसं?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट दर्जाचे घटक वापरण्यात आले आहेत.जगनराजच्या काळात तिरुपती मंदिराच्या प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळली जात होती, असा आरोप नायडू यांनी केला होता. त्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. आता तपासानंतर अहवाल समोर आला असून त्यात जनावरांची चरबी आणि फिश ऑइल सापडल्याचे सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'त्या' रिपोर्टमध्ये काय? 

आता तेलुगु देसम पक्षाने यासंदर्भातील प्रयोगशाळेचा एक रिपोर्ट समोर आणला आहे. या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये असं उघड झालं आहे की, तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा समावेश होता. या प्रयोगशाळेचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. 

नायडूंच्या दाव्यावर रेड्डी काय म्हणाले?  

जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआरसीपीनेही नायडूंच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ''चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवून मोठे पाप केले आहे.तसेच नायडू यांनी तिरुमला प्रसाद यांच्यावर केलेली टिप्पणी अत्यंत वाईट आहे. माणूस म्हणून जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती असे शब्द बोलत नाही किंवा असे आरोप करत नाही. राजकारणासाठी चंद्राबाबू काहीही चुकीचे करायला मागे पुढे पाहणार नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा हल्लाबोल रेड्डी यांनी नायडू यांच्यावर केला आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: महिलांना खरंच 4500 रुपये मिळणार का?, कारण...

रेड्डी यांनी पुढे नायडू यांना चॅलेंज दिले आहे. भाविकांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी आणि माझे कुटुंब तिरुमला प्रसादच्या बाबतीत शपथ घेण्यास तयार आहोत. चंद्राबाबूही कुटुंबासह शपथ घेण्यास तयार आहेत का?, असे चॅलेंज रेड्डी यांनी नायडूंना दिले आहे.आता नायडू हे चॅलेंज स्विकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT