Chandrayaan-3 Landing: चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

what work will Vikram lander and Pragyan rover do after Chandrayaan-3 Landing
what work will Vikram lander and Pragyan rover do after Chandrayaan-3 Landing
social share
google news

Chandrayaan-3 Soft Landing : भारताची चांद्रयान-3 मोहीम आज (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश बनेल. यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर फक्त विक्रम लँडर उतरेल. ज्याच्या आत प्रज्ञान रोव्हर आहे. (what work will Vikram lander and Pragyan rover do after Chandrayaan-3 Landing)

ADVERTISEMENT

प्रज्ञान रोव्हरचे दोन पेलोड कोणते? कसं काम करणार?

सर्वातआधी प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार आहे याविषयी आपण जाणून घेऊयात. प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड आहेत. पहिले लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) आहे. हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. खनिजांचाही शोध घेईल.

Supriya Sule : अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल, सुप्रिया म्हणाल्या, ‘चुकीचं…’

याशिवाय, प्रज्ञानावरील दुसरा पेलोड अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आहे. ते घटकांच्या रचनेचा अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह. हे सर्व घटक लँडिंग साइटभोवती चंद्राच्या पृष्ठभागावर शोधले जातील.

विक्रम लँडरबद्दल सर्वकाही जाणून घ्या…

विक्रम लँडरमध्ये चार पेलोड आहेत. पहिली रंभा (RAMBHA). ते चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि भिन्नता तपासेल. दुसरा चास्टे (ChaSTE) पेलोड चंद्राच्या पृष्ठभागाच्या उष्णतेची चाचणी करेल. तिसरा ILSA पेलोड लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपाच्या गतीविधींची तपासणी करेल. चौथा लेझर रेट्रोरेफ्लेक्टर अॅरे (LRA) पेलोड चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

कशी होणार लँडिंग?

  • विक्रम लँडर 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू करेल. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 11.5 मिनिटे लागतील.
  • 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद असेल. पुढील प्रवास 6.8 किलोमीटरचा असेल.
  • 6.8 किमी उंचीवर, वेग 336 मीटर प्रति सेकंद कमी होईल. पुढील स्तर 800 मीटर असेल.
  • 800 मीटर उंचीवर लँडरचे सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधतील.
  • 150 मीटर उंचीवर लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे 800 ते 150 मीटर उंचीच्या दरम्यान असेल.
  • 60 मीटर उंचीवर लँडरचा वेग 40 मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे 150 ते 60 मीटर उंचीच्या दरम्यान असेल.
  • 10 मीटर उंचीवर लँडरचा वेग 10 मीटर प्रति सेकंद असेल.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना म्हणजेच सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद असेल.

Mumbai Crime : चुकलं की बाजूला नेऊन…; विक्रोळीत वासनांध शिक्षकाकडून 4 विद्यार्थिनींवर अत्याचार

विक्रम लँडरच्या लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर कधी पडणार बाहेर?

प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरच्या आत आहे. जे लँडिंगनंतर 15 ते 30 मिनिटांनी दरवाजा उघडल्यावर बाहेर येईल. विक्रम लँडरचा आकार 6.56 फूट x 6.56 फूट x 3.82 फूट आहे. तर वजन 1749.86 किलो आहे.

ADVERTISEMENT

मागील वेळेच्या तुलनेत यावेळी अधिक सेन्सर्ससह लँडर अधिक मजबूत करण्यात आला आहे. जेणेकरून चांद्रयान-2 सारखी दुर्घटना घडू नये. यावेळी विक्रम लँडरमध्ये काही खास तंत्रज्ञान जोडण्यात आले आहेत. जसं की लेजर आणि आरएफ आधारित अल्टिमीटर, लेजर डॉपलर वेलोसिटीमीटर आणि लँडर हॉरिझोन्टल वेलोसिटी कॅमेरा, लेजर गाइरो आधारित इनर्शियल रिफरेंसिंग अँड एक्सेलेरोमीटर पॅकेज.

ADVERTISEMENT

लँडर कोणत्याही धोक्यापासून कसं करणार संरक्षण?

याशिवाय 800 न्यूटन थ्रॉटेबल लिक्विड इंजिन बसवण्यात आले आहे. 58 न्यूटन थ्रस्ट अल्टिट्यूड थ्रस्टर्स अँड थ्रॉटेबल इंजिन कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आहे. याशिवाय नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि नियंत्रण, धोका शोधणे आणि बचाव कॅमेरा आणि लँडिंग लेग मेकॅनिझमशी संबंधित आधुनिक सॉफ्टवेअर आहे. ही अशी तंत्र आहेत जी लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरवतील.

Chandrayaan-3 Moon Landing Live Update: विक्रम लँडर चंद्राजवळ! चांद्रयान 3 चं लँडिंग ‘इथे’ पाहा LIVE

विक्रम लँडरचे इंटीग्रेटेड सेन्सर्स आणि नेव्हिगेशन परफॉर्मेंस तपासण्यासाठी, त्याचे हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यात आले होते. ज्याला इंटिग्रेटेड कोल्ड टेस्ट म्हणतात. मग इंटिग्रेटेड हॉट टेस्ट झाली. ही एक लूप परफॉर्मेंस चाचणी आहे. ज्यामध्ये सेन्सर्स आणि NGC ला टॉवर क्रेनमधून खाली पाडून पाहिलं गेलं होतं.

विक्रम लँडरच्या लेग मेकॅनिझमचा परफॉर्मेंस तपासण्यासाठी लूनार सिम्युलंट टेस्ट बॅटवर ते अनेक वेळा पाडण्यात आलं. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर लँडर 14 दिवस काम करेल. जर परिस्थिती योग्य असेल तर ते आणखी दिवस काम करू शकते.

पृथ्वीशी कसा साधणार संपर्क?

विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरकडून चंद्राच्या पृष्ठभागावर माहिती घेईल. ही माहिती ते बंगळुरू येथील इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) वर गरज भासल्यास या कामासाठी चांद्रयान-२ च्या प्रोपल्शन मॉड्यूल आणि ऑर्बिटरची मदत घेतली जाऊ शकते. प्रज्ञान रोव्हरचा संबंध आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT