Amravati crime : दिवाण बेडमधून पडत होतं रक्त, आतमध्ये सापडले मायलेकाचे मृतदेह

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Amravati morshi news : Mother and son duo found dead in the house
Amravati morshi news : Mother and son duo found dead in the house
social share
google news

Mother son murder News : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दिवाण बेडमध्ये आईसह मुलाचा सडलेला मृतदेह आढळून आला. शुक्रवारी म्हणजे 1 सप्टेंबर रोजी ही घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Mother And Son found dead in Morshi city in Amravati)

ADVERTISEMENT

मोर्शी शहरातील शिवाजी नगर परिसरात आई आणि मुलाचा घरातच सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मयतांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. नातेवाईक आले आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

दिवाण बेडमधून पडत होते रक्त… पोलीस हादरले

मयतांचे नागपूर येथील नातेवाईक मोर्शीमध्ये आले. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घराची पाहणी केली. घराच्या एका बाजूचा दरवाजा आतून लावलेला होता. दुसऱ्या बाजूचा दरवाजा बाहेरून लावलेला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Jalana Maratha Protest : शरद पवारांच्या ताफ्याला जालन्यात विरोध, नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दरवाजा तोडला. घरात गेल्यानंतर पोलिसांना दिवाणी बेडमधून रक्त ठिपकत असल्याचे दिसले. हे दृश्य बघून सगळेच हादरले. पोलिसांनी लगेच दिवाण बेड उघडला.

बेडमध्ये 45 वर्षीय नीलिमा गणेश कापसे आणि त्यांचा 22 वर्षीय मुलगा आयुष गणेश कापसे यांचा मृतदेह आढळून आला. मायलेकाचे मृतदेह बघून पोलिसांची पायखालची जमीन सरकली कारण दोन्ही मृतदेह सडले होते.

ADVERTISEMENT

मायलेकाची हत्या… मोठ्या मुलावर संशय

पोलिसांनी तातडीने रुग्णालयातील पथकाला पाचारण केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Crime: मी एकटीच असल्याचं सांगायची अन् हॉटेलवर बोलवायची, शारीरिक संबंधानंतर तरूणी…

मिळालेल्या माहितीनुसार मयत महिलेचा मोठा मुलगा घटनेपासून गायब आहे. त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे. त्यामुळे घटना नेमकी का आणि कशी घडली याचा तपास पोलीस करताहेत. दरम्यान, पोलिसांनी असे सांगितले की, महिलेचा मोठा मुलगा सध्या गायब आहे. त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. तो सापडल्यानंतरच घटनेचं नेमकं कारण कळू शकेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT