संतापजनक! तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा ड्रग्ज प्रकरणात हात? 35 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई तक

Tuljabhavani Temple Pujari Drugs Case: ड्रग्ज तस्करीत काही पुजाऱ्यांचा सहभाग असल्यानं तुळजाभवानी मातेची बदनामी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी डॉ. गोऱ्हे यांच्याकडे केल्या होत्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचाच ड्रग्ज तस्करीत हात

point

35 लोकांवर गुन्हे दाखल, यामध्ये अनेकजण पुजारी

Tuljabhavani Temple Pujari Drugs Case : तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीच्या चर्चा ऐकू येत होत्या. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये थेट पुजारीच सापडले होते. त्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील दोषी पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मंदिर प्रवेशबंदी करण्यात येणार असून, ही कारवाई तातडीने अंमलात आणली जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस आणि मंदिर प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंदिर संस्थानने त्वरित पावलं उचलली आहेत.

हे ही वाचा >> "2029 ला देशाच्या पंतप्रधानपदी...", देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

ड्रग्ज तस्करी प्रकरणात काही पुजाऱ्यांचा सहभाग असल्यानं तुळजाभवानी मातेची बदनामी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी डॉ. गोऱ्हे यांच्याकडे केल्या होत्या. तुळजापूर दौऱ्यादरम्यान या तक्रारी समोर आल्यानंतर त्यांनी पोलिस आणि मंदिर प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन कडक कारवाईचे निर्देश दिले. या प्रकरणात आतापर्यंत 35 जणांना आरोपी करण्यात आलं असून, 80 जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या पुजाऱ्यांवरही मंदिर प्रवेशबंदीची कारवाई होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात ज्या पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत, ते मंदिरात रोज पूजा करणारे पुजारी नाहीत असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. 

तुळजाभवानी मंदिर संस्थान ही कारवाई ‘देऊळ ए कवायत कायदा’ अंतर्गत करणार असून, ड्रग्ज तस्करीत सहभागी पुजाऱ्यांची नावं लेखी स्वरूपात मागवली जाणार आहेत. जिल्हाधिकारी तसंच मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली पुढील कारवाई येत्या 1-2 दिवसांत होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे मंदिराचं पावित्र्य भंग झाल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

हे ही वाचा >> भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रताप! 'लव्ह जिहाद'चा आरोप करत पोलीस स्टेशनमध्येच तरूणांना मारलं, घटना काय?

नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं की, “देवीच्या पवित्र स्थानाला कलंक लावणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे हे प्रकरण तडीस न्यावे.” दरम्यान, मंदिर संस्थाननेही या घटनेमुळे भाविकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

21 आरोपी फरार...  

माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी,आकाश अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

14 आरोपी धाराशिव तुरूंगात

यातील अमित उर्फ चिमू आरगडे,युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे,पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके, राहुल कदम - परमेश्वर, गजानन हंगरगेकर हे 14 जण धाराशिव जेलमध्ये आहेत. 

आरोपींना अटक कशी केली?

तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली.


हे वाचलं का?

    follow whatsapp