गर्लफ्रेंडसोबत 2 मुलांच्या बापाची आत्महत्या, पण ट्रेन येताच प्रेयसी फिरली मागे, अन्…
विवाह झालेल्या दोन मुलाच्या बापाचे एका वीस वर्षाच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध जुळले होते, त्यानंतर त्यांनी लग्नाचाही विचार केला होता. मात्र घरातील विरोधामुळे त्या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे ट्रॅकवर गेले मात्र प्रियकराने एक्स्प्रेससमोर उडी मारली आणि त्याचा जीव गेला.
ADVERTISEMENT

Rajsthan Crime : राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक धक्कादायक घडली आहे. येथे राहणाऱ्या दोन मुलांचा बाप असलेली एक व्यक्ती आपल्या 20 वर्षांच्या मैत्रिणीसोबत (Girlfriend) आत्महत्या (Suicide) करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) गेला होता. मात्र ट्रेन येताच प्रेयसीने घाबरून मागे हटली आणि प्रियकराने ट्रेनसमोर उडी मारली, त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
प्रेमसंबंधाला विरोध
मृत पावलेल्या प्रियकराच्या भावाने प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांवर आता हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना बालोत्रा जिल्ह्यातील पाचपदरा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. मृत राजू भट (वय 34)चे गावातीलच 20 वर्षाच्या रवीनासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होतं मात्र राजू भट विवाहित व त्याला दोन मुलं असल्याने दोघांच्याही कुटुंबीयांचा त्याला विरोध होता.
हे ही वाचा >> Cervical Cancer ने पूनम पांडेचा मृत्यू, नेमकं काय आहे हा आजार?
ट्रेनचा वेग बघून मागे हटली
त्यांच्या प्रेमसंबंधावरूनच त्या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यामुळेच राजू आणि रवीनाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ती दोघं रेल्वे ट्रॅकवर गेले होते. राजूने ट्रेनसमोर उडी मारली पण रवीनाने घाबरून मागे सरकली. त्यानंतर रात्री उशिरा रेल्वे गार्ड व इतर कर्मचाऱ्यांनी राजूचा मृतदेह बालोत्रा रेल्वे स्थानकावर घेऊन आले. त्यानंतर मुलीलाही बालोत्रा स्थानकामध्ये बोलवण्यात आले व या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
भावाची केली हत्या
मृत राजूचा भाऊ वीरारामने तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर राजूच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. त्याने असा आरोपही केला आहे की, याआधीही राजूला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आली होती. मात्र काल रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपीने भावाचा खून करून त्याला रेल्वे रुळावर फेकून दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या हत्येला आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हत्या करणाऱ्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याने उडी मारली तिने
याप्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण प्रेमप्रकरणातून झाले आहे. 34 वर्षाच्या आणि दोन मुलं असलेल्या राजू आणि 20 वर्षाच्या रवीना ही दोघं आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेले होते. ती दोघंही यशवंतपूर-बाडमेर एक्स्प्रेससमोर उडी मारणार होते. त्यावेळी राजूने उडी मारली पण रवीनाने घाबरून माघार घेतली. त्यामुळे तिचा जीव वाचला, आणि राजूचा ट्रेनखाली मृत्यू झाला.