खेळणं देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं, अत्याचार करुन चिमुकलीला संपवलं, मैत्रीणीने सगळं सांगितलं
पीडित मुलगी ज्या मुलीसोबत खेळत होती तिने पोलिसांना सांगितलं की, एका पुरूषाने तिला खेळणी देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं होतं. या मुलीने सांगितलेल्या ठिकाणीच पीडितेचा मृतदेह सापडला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाण्यातील मुंब्रा परिसरात घडला संतापजनक प्रकार

10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून

चिमुकलीच्या मैत्रीणीने सांगितली घटना
Thane Crime News : ठाण्यातील मुंब्रा परिसरात एक संतापजनक प्रकार घडला. मुंब्र्यामध्ये एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. काल हा प्रकार घडल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या डक्टमधून हा मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात एका 19 वर्षीय आरोपीला अटक केली. या आरोपीने कबुली देताना सगळा प्रकार सांगितला.
इमारतीच्या डक्टमध्ये सापडला मृतदेह
हे ही वाचा >> धनंजय मुंडेंच्या अडचणी संपेनात, कोर्टाचा दणका, करूणा मुंडेंना...
स्थानिकांनी इमारतीच्या खिडकीच्या डक्टमधून आवाज येत असल्यानं पाहिलं असता एका मुलीचा मृतदेह दिसला. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ठाकूरपाडा परिसरातील इमारतीतील पहिल्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाथरूममधून डक्टमध्ये स्थानिकांना अर्धवट कपडे घातलेल्या मुलीचा मृतदेह आढळला होता. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर, पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.
पीडितेच्या मैत्रीणीने सांगितली घटना...
पीडित मुलगी ज्या मुलीसोबत खेळत होती तिने पोलिसांना सांगितलं की, एका पुरूषाने तिला खेळणी देण्याचं आमिष दाखवून इमारतीत नेलं होतं. या मुलीने सांगितलेल्या ठिकाणीच पीडितेचा मृतदेह सापडला होता.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबूली
मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून, पोलिसांनी संशयितांना पकडण्यास सुरुवात केली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून आसिफ मन्सूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला अटक केली. दुसऱ्या मुलीने तोच तिच्या मैत्रिणीला फसवणारा आरोपी असल्याचं ओळखलं. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
हे ही वाचा >> "मुक्ताफळं उधळणाऱ्या माणिकवारांना अजितदादांनी झापलं"
पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.
फाशी द्या नाही तर आमच्या ताब्यात द्या...
पीडितेच्या कुटुंबाने आणखी गंभीर आरोप केले आहेत. आरोपीच्यासोबत आणखी काही लोक होते. तो त्यांची नावं लपवतोय. मुलीचा गळा फाडलेला होता. खिडकिची काच काढून तिला बाहेर फेकलेलं होतं. या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. नसेल जमत तर आरोपींना लोकांच्या ताब्यात द्या असं म्हणत मुलीच्या भावाने संताप व्यक्त केला आहे.