Sharad Mohol : चार महिन्यापूर्वी पिस्तूल खरेदी अन् 25 दिवसांत मोहोळचा गेम, Inside Story
मामा नामदेव कानगुडे यांनी त्यांचा शरद मोहोळ टोळीत प्रवेश घडवून आला होता. टोळीत प्रवेश केल्याचे काही दिवसातच तो शरद मोहोळ सोबत फिरायला लागला होता. शरद मोहोळ ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायचा, त्या त्या ठिकाणी मुन्ना पोळेकर हजर असायचा.
ADVERTISEMENT
Sharad Mohol Murder Case : पंकज खेळकर, पूणे : मामाचा बदला घेण्यासाठी 20 वर्षीय भाचा मुन्ना उर्फ साहिल पोळेकरने कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. यासह पोलिसांनी या घटनेत अनेक गोष्टी उजेडात आणल्या आहेत. या हत्येसाठी फुलप्रुफ प्लानिंग करण्यात आली होती. मुन्ना पोळेकरने (Munna Polekar) चार महिन्यापूर्वीच पिस्तूल खरेदी केली होती. या पिस्तूलाद्वारे तो गेल्या अनेक महिन्यापासून गोळीबाराचा सराव करत होता. यानंतर त्याचा मोहोळ टोळीत प्रवेश घडवून आणण्यात आला. आणि इथूनच शरद मोहोळच्या हत्येच्या कहाणीला सुरूवात झाली होती. नेमकी ही कहाणी काय आहे? हे जाणून घेऊयात. (gangster sharad mohol murder case munna polekar pune police press conference pune news)
ADVERTISEMENT
मुना उर्फ साहिल पोळेकर यांचा सख्खा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांडले यांचा ही या गुन्ह्यात मोठा सहभाग होता. खरं तर नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गांडले या दोघांचा शरद मोहोळशी जुना वाद होता. या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भाचा मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याच्याद्वारे हत्येचा कट रचला होता. त्यामुळे या शरद मोहोळ हत्याकांडातील खरे मास्टरमाईंड नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गांडले आहेत.
हे ही वाचा : Kiran Mane : अभिनेता किरण मानेची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश
दरम्यान या हत्येसाठी साहिलने चारच महिन्यापूर्वीच पिस्तूल खरेदी केली होती. या पिस्तुलातून गोळीबार करण्याचा त्याने अनेक महिने सराव देखील केला होता. या दरम्यानच मामा नामदेव कानगुडे यांनी त्यांचा शरद मोहोळ टोळीत प्रवेश घडवून आला होता. टोळीत प्रवेश केल्याचे काही दिवसातच तो शरद मोहोळ सोबत फिरायला लागला होता. शरद मोहोळ ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायचा, त्या त्या ठिकाणी मुन्ना पोळेकर हजर असायचा. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच मुन्ना शरद मोहोळच्या खूपच जवळ पोहोचला होता.
हे वाचलं का?
शरद मोहोळसोबत असताना मुन्ना नेहमी त्याची हत्या करण्यासाठी पिस्तूल बाळगून असायचा. मात्र ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दीमुळे ते शक्य व्हायचे नाही. त्यात शुक्रवारी आरोपी वगळता दोघेच असल्याचे पाहुन मुन्नाने डाव साधला आणि शरद मोहोळच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.विशेष म्हणजे टोळीत प्रवेश केल्याच्या 25 दिवसातच त्याने शरद मोहोळचा गेम केला होता.
हे ही वाचा : ISRO ची ऐतिहासिक कामगिरी! ‘आदित्य एल1’ पोहोचले निश्चित स्थळी, PM मोदी काय म्हणाले?
या हत्येनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. शरद मोहोळला गोळ्या झाडणारे तीन मारेकरी सुतारदरा भागातून पळून गेले. मात्र त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्सव्हीयू गाडी घेऊन हजर होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून या 8 जणांनी साताऱ्याच्या दिशेने वाहनातून पळून जायचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन त्यांचा पाठलाग करून शिरवळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT