Mumbai Crime: वृद्ध दाम्पत्याच्या तोंडाला पट्टी लावली, हात-पाय बांधले…चोरीच्या घटनेनंतर घडली भयंकर घटना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbai elderly couple tie hands feet during robbery tape pasted mouth women dead tardeo news
mumbai elderly couple tie hands feet during robbery tape pasted mouth women dead tardeo news
social share
google news

दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकला होता. या दरोड्यात आरोपींनी वृद्ध दाम्पत्याच्या तोंडाला पट्टी लावून त्यांचे हात-पाय बांधून चोरीची घटना घडवून आणली होती. या घटनेनंतर आरोपींनी वृद्ध दाम्पत्याला त्याच अवस्थेत घरात सोडून पळ काढला होता. या चोरीच्या घटनेनंतर आता वृद्ध महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (mumbai elderly couple tie hands feet during robbery tape pasted mouth women dead tardeo news)

ADVERTISEMENT

ताडदेव पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वृद्ध दाम्पत्य सुरेखा अग्रवाल आणि 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल हे ताडदेवमधील युसूफ मंजिल इमारतीत एकटेच राहतात. त्या दिवशी वृद्ध दाम्पत्य सकाळी 6 वाजता मॉर्निग वॉकसाठी घरातून निघत होते. या दरम्यान तीन चोरट्यांनी घटनास्थळी पोहोचत वृद्ध दाम्पत्याला धमकावून त्यांच्याच घरात घुरखोरी केली. यानंतर आरोपींनी सुरेखा अग्रवाल आणि मदन मोहन अग्रवाल यांच्या तोंडाला टेप लावून त्यांचे हात-पाय बांधले होते. यानंतर आरोपींनी घरात डल्ला मारला होता.

हे ही वाचा : Nagpur Crime : … म्हणून त्याने सना खानशी केलं होतं लग्न, हत्येची Inside Story

चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला बांधल्यानंतर घरातील सोन्याची दागिने, घड्याळ आणि रोख रक्कम लांबवली होती. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातून पळ काढताना वृ्द्ध दाम्पत्याची सुटका न करताच पोबारा केला होता.त्यामुळे वृद्ध दाम्पत्य त्याच अवस्थेत घरात होते. या दरम्यान मदन अग्रवाल यांनी कसेबसे घराच्या दरवाजाजवळ जाऊन सेफ्टी अलार्म वाजवला होता. या अलार्मनंतर सोसायटीतील नागरीकाने त्यांच्या फ्लॅटजवळ पोहोचून त्यांची सुटका केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेदरम्यान सुरेखा अग्रवाल या बेशुद्ध झाल्या होत्या.त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. या घटनेनंतर अग्रवाल यांना मोठा धक्का बसला होता. या संपूर्ण घटनेनंतर आता अग्रवाल यांनी ताडदेव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानूसार भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा : लव्ह मॅरेज केलं, पण इंस्टाग्राममुळे झाला भयंकर शेवट, दोन लेकरांसमोरच पतीने…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT