Crime: लिव्ह इन रिलेशनशीप, पैशाचा वाद अन् हत्या, तब्बल 5 वर्षांनी न्युज अँकरच्या हत्येचा उलगडा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

murder and buried chhatisgadh news anchor murder solved after five years crime story
murder and buried chhatisgadh news anchor murder solved after five years crime story
social share
google news

Chhattisgarh News Anchor Murder Case : छत्तीसगढमध्ये (Chhattisgarh) एका न्युज अँकरच्या हत्येची घटना घडली होती. सलमा सुल्ताना लश्कर असे हत्या करण्यात आलेल्या न्युज अँकरचे नाव होते. 5 वर्षापूर्वी तिच्या हत्येची घटना घडली होती. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता प्रियकरांसह दोघांना अटक केली आहे. दरम्यान आता प्रियकराने सलमाची हत्या का केली होती? या हत्येचा उलगडा कसा झाला? हे जाणून घेऊयात. (murder and buried Chhattisgarh news anchor murder solved after five years crime story)

ADVERTISEMENT

छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यातील स्थानिक केबल नेटवर्कमध्ये सलमा लश्कर न्युज अँकरचे काम करायची. या दरम्यान मधूर नावाच्या तरूणासोबत सलमाची ओळख वाढली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे जाऊन दोघांनी मधुरच्या शारदा विहार परिसरात एकत्र राहायला सुरुवात केली. यानंतर अचानक 2019 साली सलमा लष्कर गायब झाली होती. या प्रकरणी सलमाच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यासोबत सलमाचा प्रियकर मधूरवर संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे घटनेचा तपास होऊ शकला नाही, आणि प्रकरण मागे पडले.

हे ही वाचा : Crime: प्रेमविवाह करून घरी आणलेल्या सुनेने उद्योजक सासऱ्याला संपवलं?, हादरवून टाकणारी कहाणी

ऑपरेशन मुस्कानने हत्या प्रकरण उलगडलं

दरम्यान याच वर्षात मार्चमध्ये पोलिसांनी महिला आणि लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही मोहिम राबवली होती. या मोहिमेत पोलिसांच्या हाती सलमाचीही फाईल लागली. या फाईलीत सलमाचा हत्या प्रकरणात कोणताच तपास झाला नसल्याचे समोर आले होते. कोणाचेही जबाब देखील नोंदवण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ स्वरूपात पोलिसांची टीम गठीत करून घटनेचा तपास सुरु केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बँकेतून घेतलं कर्ज

पोलीस तपासात सलमाने बँकेतून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली होती. सलमाच्या या कर्जाचे हफ्ते आरोपी प्रियकर मधूर साहू भरता होता. मधूर साहू हा जिमचा मालक होता आणि तो सलमाच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी तिच्या अंकाऊंटमध्ये पैसे पाठवायचा. याच दरम्यान पोलिसांनी सलमाचे कॉल डिटेल्सही तपासले. यामध्ये सलमाची अनेकदा साहूशी बोलणे होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सलमाच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मधूर साहूवर संशय बळावला होता.

ADVERTISEMENT

असा रचला हत्येचा कट

पोलिसांनी संशयाचा आधारावर मधूर साहूला अटक केली. या अटकेनंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. पैशाच्या व्यवहारातून दोघांमध्ये वादविवाद सूरू होता. या वादातून मधूरने सलमाची हत्या केल्याची माहिती दिली. मधुरने त्याच्या शारदा विहार येथील घरात 21 ऑक्टोबर 2018 रोजी दोन साथिदारासह सलमाची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह पुलाखाली दफन केला होता. मधूरने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी सलमाचा मृतदेह शोधायला सुरूवात केली होती. पोलिसांनी सेटेलाईट डेटा, थर्मल इमेजिंग आणि ग्राऊड पेनेट्रेशनच्या माध्यमातून मृतदेहाचा तपास सुरु केला आहे. पण त्या जागी आता नेशनल हायवे बनवण्यात आल्याने मृतदेहाचा शोध खूपच कठीण बनला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime: गुप्त फोन, प्रियकर अन्… जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात मधुर साहू (37), कौशल श्रीवास (29), अतुल शर्मा (26) या आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT