नाशिकमध्ये बाप्पाला निरोप देताना काळाने साधला डाव! दोघांचा मृत्यू, तर दोघांचा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

nashik district ganesh visarjan 4 people drowned two dead bodies were found, search for the two
nashik district ganesh visarjan 4 people drowned two dead bodies were found, search for the two
social share
google news

Ganesh Visrajan: नाशिकसह जिल्ह्यात सकाळपासून उत्साहात गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी बाप्पांचे विसर्जन (Visrajan Mirvanuk) करताना दोन वेग वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जण बुडाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाप्पाला निरोप देताना चार जण बुडाल्यानंतर (four youth drowned) पोलिसांच्या आणि नागरिकांच्या मदतीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी दोघांचे मृतदेह सापडले मात्र दोघांच्या मृतदेहांचा शोध (Search dead bodies) सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (nashik ganesha mirvanuk four youths drowned river during two bodies were found and search)

ADVERTISEMENT

घटनास्थळी अग्निशमन दल

नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील नदीकिनारी गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघे जण विसर्जनासाठी आले होते. याचवेळी ते दोघेही बुडाल्याची माहिती समोर आली असून सद्यस्थितीत या दोघांचाही महापालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा >> बाप्पाच्या मिरवणुकीत अनर्थ!, डीजेच्या दणदणाटात सांगलीत 2 युवकांचा मृत्यू

दोघांचे मृतदेह सापडले

तर दुसरी घटना वळदेवीपरिसरामध्ये घडली आहे. वालदेवी परिसरात मित्रांसोबत गेलेल्या दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दोघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी हे दोन्ही मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचवणाराही वाहून गेला

यावेळी प्रसाद दराडे हा पाण्याजवळ गेल्याने त्याचा पाय घसरून पाण्यात पडला व पोहता येत नसल्याने पाण्यात तो बुडू लागला. तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे जण वाहून गेले. नदी पात्रातील दगडांमुळे ते जखमी झाले होते.

हे ही वाचा >> Manipur Violence : मुख्यमंत्र्यांचं वडिलोपार्जित घर जाळण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या वाहन मदतीला

त्यानंतर दोघा युवकांना पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रोहित नागरगोजे याला जिल्हा रुग्णालयात तर प्रसाद दराडे यास बिटको व नंतर सिन्नर फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासल्यानंतर मात्र मृत म्हणून घोषित केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT