Crime: नदीवर कपडे धुवायला उतरले, पोहायचा मोह आवरला नाही अन् घडली भयंकर घटना
कल्याणच्या (Kalyan) उल्हास नदीमध्ये (Ulhas River) दोन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोन्ही तरूण कपडे धुण्यासाठी नदीवर आले होते. यावेळी पोहायचा मोह आवरता आला नसल्याने पाण्यात उतरले होते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
कल्याणच्या (Kalyan) उल्हास नदीमध्ये (Ulhas River) दोन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोन्ही तरूण कपडे धुण्यासाठी नदीवर आले होते. यावेळी पोहायचा मोह आवरता आला नसल्याने पाण्यात उतरले होते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सलमान अन्सारी आणि सरफराज अन्सारी असे या दोन्ही तरूणांची नाव आहे. या दोन्ही तरूणांचा आता अग्मिशमन दलाकडून आता शोध घेतला जात आहे. कल्याणच्या मोहनेजवळ ही घटना घडली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. (two boy drowned in ulhas river in kalyan story ulhasanagar)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या (Ulhasnagar) शांतीनगर परिसरात राहणारे सलमान अन्सारी आणि सरफराज अन्सारी हे दोघे तरुण उल्हास नदीवर (Ulhas River) कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेले होते.हे दोघेही तरूण नातेवाईक होते. यामधली सलमान अन्सारी हा मॅकेनिकचं काम करायचा, तर सरफराज हा चालत होता. या दोघांमधील एक तरुण नदीत पोहण्यासाठी उतरला होता. या तरूणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला होता. यावेळी या तरूणाला वाचविण्यासाठी नदीत उतरलेल्या दुसरा तरूणही बुडाला. आणि अशाप्रकारे दोन्ही तरूण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.
हे ही वाचा : Sana khan :’…नदीत फेकला मृतदेह’, भाजप पदाधिकारी हत्या प्रकरणाची Inside Story
सर्फराज हा उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहताच सलमानने नदीत उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे ही पाण्यात बुडाले आणि प्रवाहात वाहून गेले आहेत. आज दुपारच्या सुमारस ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन विभाग आणि खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन दलाने आणि गावकऱ्यांच्या मदतीने सध्या नदीत शोधकार्य सुरू होते. अद्याप तरी दोघांचा शोध लागला नाही आहे. य़ा अन्सारी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून कल्याणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : ISIS प्रकरणात NIAची मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून एकाला अटक
दरम्यान याआधी पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील कळंब जवळील एकलहरे हद्दीतील नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. प्रीती शाम खंडागळे (वय 17) आणि आरती श्याम खंडागळे ( वय 18) अशी या मृत तरूणींची नावे आहेत. कपडे धुण्यासाठी या तरूणी नदीपात्रात आल्या होत्या. यावेळी पाय घसरून एक तरूणी पडली होती, तर तिला वाचवण्यसाठी दुसऱ्या तरूणीने उडी घेतली होती. दोघांनाही पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT