एग्जिट पोल

Worli Hit and Run प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह कोण?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

worli hit and run case who is rajesh shah eknath shinde shiv sena leader mihir shah son accident story
पोलिसांनी राजेश शाह (Rajesh shah) यांना ताब्यात घेतले आहे. त
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदे गटातील नेते राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

point

अपघाताच्या घटनेवेळी राजेश शाह कारमध्ये नव्हते.

point

राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह (Mihir Shah) हा गाडीत होता.

Who is Rajesh shah : वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या घटनेवेळी राजेश शाह कारमध्ये नव्हते. पण राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह (Mihir Shah) हा गाडीत होता. महिलेला बीएमडब्ल्यु कारखाली चिरडल्यानंतर तो फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी राजेश शाह (Rajesh shah) यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे राजेश शाह नेमके कोण आहेत? अशी चर्चा सुरु झाली आहे. (worli hit and run case who is rajesh shah eknath shinde shiv sena leader mihir shah son accident story) 

कोण आहेत राजेश शाह? 

  • राजेश शाह हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे उपनेते आहेत. 
  • राजेश शाह यांनी नुकताच जिल्ह्यात कोकण पदवीधरचा प्रचार केला होता.
  • लोकसभा निवडणुकीतील हेमंत सवरा यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय होते.  
  • शिवसेना फुटीनंतर ठाकरेंनी पालघर जिल्हाप्रमुख असलेल्या राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 
  •  पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाकडून ही कारवाई करण्यात आली होती.
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या या कारवाईनंतर राजेश शाहांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 
  • एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते पालघर जिल्ह्याचे उपनेते आहेत. 

नेमकी घटना काय? 

मुंबईच्या वरळी भागात रविवारी हिट अँड रनची घटना घडली होती. बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. ज्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली, त्या गाडीत शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह आणि चालक होता. या घटनेनंतर दोघेही फरार आहेत. त्यामुळे चौकशीसाठी राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हे ही वाचा : Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाहांची मोठी घोषणा

 वरळीतील अँटरिया मॉलजवळ ही घटना घडली. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी नाकवा या पतीसोबत सकाळी मासे लिलावासाठी ससून डॉकला गेल्या होत्या. मासे घेऊन दुचाकीवरून परत येत असताना नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला कारने धडक दिली. गाडीवर भरपूर ओझे असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दोघेही पती पत्नी बीएमडब्ल्यू कारच्या बोनेटवर आदळले होते.
 
 या दरम्यान पतीने प्रसंगावधान दाखवत लगेच गाडीच्या बाजूला उडी मारली. मात्र महिलेला बाजूला होता आले नाही. त्यातच घाबरलेल्या चालकाने गाडी जोरात पळवली. त्यामुळे बोनेटवर पडलेली महिला दुचाकीसह दूरपर्यंत फरफटत नेली. यात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला मुंबईतील नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणात राजेश शाह यांचा मुलगा आणि चालक दोघेही फरार आहेत. त्यामुळे पोलिसांनी राजेश शाह यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : Supriya Sule : विधान परिषद निवडणुकीआधी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, पडद्यामागे काय घडतंय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT