पालघर: पत्नी पतीला निरोप द्यायला गेली अन् काळाने साधला डाव; चिमुकलीचा करुण अंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Virar area of Palghar district Tragic death of girl after falling from fourth floor of multi-storied building incident
Virar area of Palghar district Tragic death of girl after falling from fourth floor of multi-storied building incident
social share
google news

Palghar Accident: पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या मुलीचा  दुर्देवी अंत (4-year girl Death) झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती बुधवारी दिली. ही घटना पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात (Virar Area Building) असणाऱ्या 19 मजली इमारतीखाली ही घटना घडली आहे. ही दुर्देवी घटना घडल्यानंतर परिसरातील अनेकांना धक्का बसला.

ADVERTISEMENT

काळाने डाव साधला

ही दुर्देवी घटना घडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, 19 मजली असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मृत मुलीचे कुटुंबीय भाडोत्री प्लॅटमध्ये राहतात. पोलिसांनी सांगितले की, पहाटे जेव्हा मुलगी झोपलेली होती. त्यावेळी तिची आई तिच्या पतीला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेली होती. आई बाहेर गेलेली असतानाच मुलीला जाग आली. तेव्हा आई घरी नसल्याचे पाहत तिने जेव्हा बेडरुमच्या खिडकीमधून बाहेर बघत असताना तिचा तोल जाऊन ती चौथ्या मजल्यावरुन सरळ खाली पडली. त्यातच मुलीचा दुर्देवी अंत झाला.

हे ही वाचा >> मुंबई लोकलमध्ये ‘दे दणा दण’! गळा पकडला अन्…; VIDEO पाहुन अंगावर येईल काटा

पालकांचा धाडसी निर्णय

इमारतीवरुन मुलगी खाली पडल्याचे लक्षात येताच तेथील एका नागरिकाने जवळच असलेल्या रुग्णालयात जखमी मुलीला दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी डॉक्टरांशी बोलून महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आम्हाला एकुलती एक मुलगी होती. मात्र आता तिच्या मृत्यू नंतर आम्ही तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Dating app वर भेटलेल्या तरुणीला घरी आणलं अन् झाला ‘गेम’, रात्रीत काय घडलं?

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

विरार परिसरात राहणाऱ्या लहान मुलीचा इमारतीवरुन पडून दुर्देवी अंत झाल्याने आणि बेडरुमच्या खिडकीतून पडून मृत्यू झाल्याने खिडक्यांना ग्रिल का नव्हते असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मात्र तिच्या मुलीच्या पालकांनी मुलीच्या मृत्यूनंतर तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. विरार परिसरातील इमारतीवरून पडून मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची नोंद विरार पोलिसात दाखल झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT