BJP 2nd list: भाजपकडून महाराष्ट्रातील यादी जाहीर, तब्बल 20 उमेदवारांना दिलं तिकीट
BJP second list lok sabha election 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजप आज त्यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
BJP candidate second list: नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजप त्यांची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी एकूण 72 उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 20 जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. ज्यामध्ये 4 महत्त्वाच्या नेत्यांची तिकीट भाजपने कापली आहेत. ज्यामध्ये 14 उमेदवारांना पुन्हा तिकीट मिळालं आहे. तर यात 6 नवी नावं असल्याचं पाहायला मिळालं. भाजपने 20 जणांची यादी जाहीर केल्यानंतर आता महायुतीवर त्याचे काय परिणाम होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (bjp release its second list for lok sabha elections 2024 announce candidates from maharashtra for elections)
ADVERTISEMENT
या यादीमधील महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने दिग्गज नेत्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. ज्यामध्ये नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.
हे वाचलं का?
भाजपने 'या' 20 उमेदवारांना दिलं तिकीट
1. नंदूरबार (ST राखीव) - हिना गावित
2. धुळे - सुभाष भामरे
3. जळगाव - स्मिता वाघ
4. रावेर - रक्षा खडसे
5. अकोला - अनुप धोत्रे
6. वर्धा - रामदास तडस
7. नागपूर - नितीन गडकरी
8. चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
9. नांदेड - प्रतापराव पाटील-चिखलीकर
10. जालना - रावसाहेब दानवे
11. दिंडोरी (ST राखीव) - भारती पवार
12. भिवंडी - कपिल पाटील
13. मुंबई उत्तर - पियूष गोयल
14. मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) - मिहीर कोटेचा
15. पुणे - मुरलीधर मोहोळ
16. अहमदनगर - सुजय विखे-पाटील
17. बीड- पंकजा मुंडे
18. लातूर (SC राखीव) - सुधाकर श्रृंगारे
19. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
20. सांगली - संजयकाका पाटील
दरम्यान, महाराष्ट्राशिवाय दीव-दमण, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड येथील उमेदवारांची भाजपने घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT