Baramati Lok Sabha Elections 2024 : अजित पवार खरंच सुप्रिया सुळेंविरोधातील उमेदवार बदलणार?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशीच लढत होणार, हे जवळपास निश्चित आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती काय आहे?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारच असतील उमेदवार

point

महादेव जानकरांऐवजी सुनेत्रा पवार कशा वरचढ?

point

सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच होणार लढत

Baramati Lok Sabha Elections 2024, Supriya Sule vs Sunetra Pawar : महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण, त्यानंतर ही चर्चा सुरू झाली की, सुप्रिया सुळेंविरोधात महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. खरंच सुनेत्रा पवारांना बाजूला करून जानकर निवडणूक लढवू शकतात का? याबद्दलच जाणून घेऊयात. (mahadev jankar will contest against supriya sule instead of sunetra pawar, is it possible?)

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळेंविरोधात खऱंच महादेव जानकर उमेदवार असू शकतात का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे, ते पहा...

बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे, नेमकी काय भूमिका आहे? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, "आमच्यावर प्रेम करणारी जी काही मंडळी आहे; ज्यांना सुनेत्रा पवार उमेदवार असल्यामुळे भय वाटतं, अशीच मंडळी अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत."

हे वाचलं का?

"महादेव जानकर हे महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत झालेला आहे. कुठला मतदारसंघ त्यांना देण्यात येईल, याची घोषणाही दोन-तीन दिवसांत होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत उमेदवारांची घोषणा कधी करायची, यासंदर्भातही मी अजित पवारांसोबत चर्चा करणार आहे."

सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांच उमेदवार असतील, कारण...

सुनेत्रा पवारांऐवजी बारामतीत अजित पवार दुसरा उमेदवार देणार का? याबद्दल पत्रकार प्रशांत अहीर म्हणतात की, "पहिला मुद्दा असा की, पवारांच्याच कुटुंबातील उमेदवार महायुतीकडून का? याचा अर्थ समजून घेतला, तर सुनेत्रा पवारांची उमेदवारी इथे अधिक राहण्याची शक्यता का आहे, हा मुद्दा आपल्या लक्षात येईल."

ADVERTISEMENT

"२०१४ चा निकाल बघितला तर बारामती विधानसभा मतदारसंघ आणि इंदापूर विधानसभा यामधून सुप्रिया सुळेंना सव्वा लाख मतांचं मताधिक्य होतं. तेच २०१९ मध्ये निव्वळ बारामती लोकसभा मतदारसंघातून एक लाख ३० हजारांच्या जवळपास सुप्रिया सुळेंना मताधिक्य होतं. इंदापूर आणि बारामती अशा दौन्हीचं मताधिक्य जवळपास दोन लाख होतं. ", अहीर म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपची आणखी एका पक्षासोबत युतीची चर्चा फिस्कटली! 

"या दोन मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना जे मताधिक्य मिळतं, तेच त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करतं. याच दोन विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य कमी करण्यासाठी भाजपने गेल्या दोन निवडणुकीत काय केले, तर 2014 मध्ये महादेव जानकरांना लढवलं गेलं. त्यावेळी परिणाम दिसला नाही. २०१९ मध्ये कांचन कुल यांना लढवलं गेलं, त्यावेळीही फारसा परिणाम भाजपला दिसला नाही", असे अहीर सांगतात.

"दोन्ही वेळा भाजपला पराभव पत्करावा लागला. जर भाजपला बारामती लोकसभा मतदारसंघ पवारांकडून हिसकवायचा असेल, तर तो पवारांकडून हिसकावून घेऊन पवारांकडेच द्यावा लागणार आहे. ही रणनीती भाजपच्या लक्षात आल्यानंतर आणि अजित पवारांशी सूत जुळायला लागल्यानंतर ही राजकीय समीकरणे शिजली गेली आणि मला असं वाटतं नाही की, हौसेने उमेदवारीसाठी उतरले असतील. त्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातीलच उमेदवार द्यायचा आणि पवार-पवारांमध्ये हा संघर्ष होऊ द्यायचा. सुनेत्रा पवार जर उमेदवार असतील, तर कुठेतरी बारामती आणि इंदापूरमध्ये मताधिक्य कमी होऊ शकतं, असा एक विचार महायुतीकडून मांडलं जात आहे. ते आताच्या घडीला खरं मानायला हरकत नाही", असे विश्लेषण प्रशांत अहीर यांनी सुनेत्रा पवारच उमेदवार का असतील मुद्द्यावर बोलताना मांडले. 

महादेव जानकरांचं नाव का चर्चेत आले?

महायुतीमध्ये राहणार असल्याचे महादेव जानकर यांनी जाहीर केले. त्यानंतरच त्यांचं नाव बारामतीतील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलं. याबद्दल प्रशांत अहीर सांगतात की, "महादेव जानकर यांच्याकडे राजकीय चर्चा सरकण्याचे कारण असे की, बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाच्या मतांचं प्राबल्य बऱ्यापैकी आहे. तिन्ही मतदारसंघ मिळून साधारणतः चार ते साडेचार लाख मते धनगर समाजाची आहेत. ती जर मते आपल्याकडे वळवायची असतील, तर त्यासाठी शरद पवारांनी पहिलं जाळ फेकले ते महादेव जानकर यांच्यावर."

"माढा मतदारसंघातून महादेव जानकर उमेदवार होऊ शकतील, असे सांगितलं. मग ते राजकारण सुरू झालं. नंतर जानकर पुन्हा महायुतीकडे म्हणजे अजित पवारांकडे गेले आणि तो प्रश्न मावळला. आज धनगर समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून शरद पवारांकडे मोठा नेता दिसत नाही. इंदापूरचे आमदार आहेत, दत्तात्रय भरणे ते अजित पवारांसोबत आहेत. उत्तमराव जानकर अजित पवारांसोबत आहेत. महादेव जानकर हे देवेंद्र फडणवीसांसोबत आहेत. त्यामुळे हे धनगर समाजाचे नेते भाजपसोबत आहेत."

हेही वाचा >> घराणेशाही, राजकीय समीकरणे! 'या' जागा महायुती-मविआसाठी डोकेदुखी का ठरल्यात?

प्रशांत अहीर हा मुद्दा अधिक विस्तृतपणे मांडताना म्हणाले की, "आपल्याला धनगर समाजाचा नेता लागणार आहे किंवा ते नेतृत्व आपल्यासोबत असायला हवे म्हणून महादेव जानकरांभोवती हे राजकारण फिरत होतं. महादेव जानकर हे बारामतीचे उमेदवार ठरू शकतात की, नाही याबद्दल सांगायचं झालं... जर जानकरांना बारामतीतून लढवायचं झालं, तर २०१४ साऱखी आताची परिस्थिती नाही. २०१४ मध्ये जर निवडणूक जिंकता आली नाही, तर आजच्या परिस्थिती ती आणखी कठीण होणारी आहे. कारण सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून नाही, तर पक्ष म्हणून प्रत्येकाच्या घरी गेल्या आहेत. प्रत्येक मोठ्या विरोधकांच्या घरी गेल्या आहेत."

"शरद पवार हे २६ वर्षानंतर अनंतराव थोपटेंच्या घरी जात असतील, तर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची शक्यता किती अधिक आहे, यांचा अंदाज आपण बांधू शकतो. अजित पवारांचे जे जे विरोधक आहेत, त्या सगळ्या मंडळींकडे सुनेत्रा पवार जाऊ आल्या आहेत. प्रत्येकाच्या गाठीभेटी घेतल्या. त्याला अपवाद फक्त विजय शिवतारे आहेत. ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार फिरत आहेत, ते बघता त्यांचे उमेदवार म्हणून नाव मागे घेणे, हे अजित पवारांच्या स्वभावाला साजेसं नाही", असं अहीर सांगतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT