Mandi Lok Sabha : कंगना रणौत यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर! कोणता फॅक्टर जाणार जड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने अभिनेत्री कंगना रणौतला तिकीट दिले आहे.
अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कंगना रणौत यांच्यासाठी लोकसभेची लढाई किती कठीण?

point

कंगणा रणौत यांना भाजपमधूनच होतोय विरोध

point

काय आहे मंडी लोकसभा निवडणुकीचे गणित?

Kangana Ranaut Mandi Lok Sabha election 2024 : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. या मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर कंगना यांनी प्रचाराचा नारळ फोडला असला, तरी विजयाचा मार्ग सोपा दिसत नाही. मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना यांना तिकीट दिल्यामुळे भाजपमध्येच खदखद असून, राजघराण्याचा प्रभावही आहे... त्यामुळे कंगना रणौत यांचा विजयाचा मार्ग अडचणींनी भरलेला आहे. (Kangana Ranaut's path may be full of difficulties due to BJP's dissidents and the influence of the former royal family in Mandi Lok Sabha)

ADVERTISEMENT

हिमाचल प्रदेशचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, तीन वेळा खासदार आणि कुल्लूच्या माजी राजघराण्याचे वंशज महेश्वर सिंह यांनी पक्षाच्या हायकमांडला रणौत यांना तिकीट देण्याच्या निर्णयाचा पुन्हा विचार करण्यास सांगितले आहे. 

दुसरीकडे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या असंतुष्टांनी रणनीती तयार करण्यासाठी बैठक घेतली आहे.

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान करणारे काँग्रेसचे बंडखोर रवि ठाकूर यांना लाहौल आणि स्पिती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिल्यानंतर भाजप नेते आणि माजी मंत्री राम लाल मार्कंडा यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

मंडी लोकसभा : राजघराण्यांचे वर्चस्व 

मंडी लोकसभा मतदारसंघात 17 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी आठ अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. राजघराण्यांचा मंडी लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या वंशजांनी या जागेसाठी झालेल्या दोन पोटनिवडणुकांसह 19 पैकी 13 निवडणुका जिंकल्या आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महायुती सरकारचं टेन्शन वाढलं! जरांगे पाटलांची मोठी घोषणा 

कंगना रणौत यांनी शुक्रवारी रोड शो आणि रॅलीने आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करताच, भाजप नेते महेश्वर सिंह यांनी रणौत यांना तिकीट देण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती पक्षाच्या हायकमांडला केली. रणौत यांना पक्षात कोणतेही स्वारस्य नाही, त्यांचे पक्षासाठी योगदान नाही' असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाने आपल्याला तिकीट देण्याचे वचन दिले होते, असा दावाही त्यांनी केला.

ADVERTISEMENT

बंडखोरांचा इशारा

सिंह म्हणाले की, "भाजप हायकमांडशी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मला आधी तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते." 

कंगना यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर, महेश्वर सिंह यांचा मुलगा हितेश्वर सिंह, भाजपचे माजी सरचिटणीस राम सिंह आणि माजी अन्नी आमदार किशोरी लाल - या तिघांनीही भाजपकडून तिकीट न मिळाल्याने 2022 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. असंतुष्ट भाजप नेत्यांसोबत इतरांनी एक बैठक घेतली.

हेही वाचा >> बारामतीत नणंद विरुद्द भावजय लढत, पण कुणाचं पारड जड? 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षा आणि मंडी मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह या आधीच पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत. त्या म्हणाल्या होत्या की, मतदारसंघातील परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल नाही आणि कार्यकर्ते निराश झाले आहेत. मात्र, कंगना यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिभा सिंह यांनी आपली भूमिका बदलली आहे. 'काँग्रेसच्या सूचनांचे पालन करणार' असे त्या म्हणाल्या. 

कंगनासाठी आनंदाची बातमी

शुक्रवारी पीटीआयशी बोलताना त्या म्हणाल्या, 'लोकांची माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याशी भावनिक नाते आहे आणि त्यामुळेच लोक नेहमी आमच्या कुटुंबाला पाठिंबा देतात आणि या कुटुंबातील कोणीतरी ही निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे.' 

कारगिल युद्धाचे नायक आणि भाजप नेते खुशाल ठाकूर यांनी कंगनाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे, ही रणौत यांच्यासाठी दिलासादायक बाब आहे. ते शनिवारी म्हणाले, "मी कंगनाला पाठिंबा देतोय. या लोकसभा मतदारसंघात एक लाखांहून अधिक माजी सैनिक आहेत."

हेही वाचा >> उदयनराजेंनी मारली शिवेंद्रराजेंना मिठी, अन्... पाहा सॉलिड Video

शुक्रवारी पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना, रणौत यांनी स्वतःला मंडीतील लोकांची "मुलगी आणि बहीण" असे वर्णन केले. त्या हिमाचल प्रदेशातून येत असल्यामुळे मला सतत "धमकी" दिली जाते, असा दावा तिने केला. त्या म्हणाल्या की, 'मी माझ्या गावात देवीचे एक छोटे मंदिर आणि मनालीमध्ये घर बांधले आहे. मी स्वत:साठी एक स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष आणि मेहनत केली."

प्रतिभा सिंह आणि विक्रमादित्य सिंह यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवत त्या म्हणाल्या, 'माझे वडील किंवा पती मुख्यमंत्री आहेत आणि मी राजकारणात आले असे नाही."

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT