Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला मोठा झटका! माजी आमदाराने सोडली साथ

मुंबई तक

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 dr namdev usendi resign from congress party  gadchiroli chimur lok sabha dr namdev kirsan election maharashtra
काँग्रेसच्या माजी आमदाराने पक्षाची साथ सोडली आहे.
social share
google news

Congress Former MLA Dr. Namdev usendi resignation : व्यंकटेश दुडमवार, गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच जागावाटप लवकरच जाहीर होणार आहे. याआधी काँग्रेसने त्यांचे नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमुर या चार जागांवर उमेदवार जाहीर केले होते. या जागांवरील उमदेवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसच्या माजी आमदाराने पक्षाची साथ सोडली आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  (lok sabha election 2024 dr namdev usendi resign from congress party  gadchiroli chimur lok sabha dr namdev kirsan election maharashtra) 

ADVERTISEMENT

काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली - चिमूर मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी डॉ. नामदेव उसेंडी आग्रही होते. मात्र शनिवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत गडचिरोली - चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. नामदेव उसेंडी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

हे ही वाचा : अजित पवार खरंच सुप्रिया सुळेंविरोधातील उमेदवार बदलणार?

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे गेल्या 2008 पासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. 2009 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसतर्फे त्यांनी लोकसभा लढवली होती. मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या लोकसभा निवडणूक लढवण्यासही ते इच्छुक होते. मात्र जिल्ह्याबाहेरील उमेदवार म्हणजे  गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिलाय. तसेच पक्ष सोडण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान गेल्या शनिवारी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. या यादीत काँग्रेसने नागपूरमधून विकास ठाकरे,  रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदीयामधून डॉ. प्रशांत पडोळे आणि गडचिरोली चिमुरमधून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर आता लवकरच काँग्रेसकडून इतर जागांवर उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : भाजपची आणखी एका पक्षासोबत युतीची चर्चा फिस्कटली!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT