Sharad Pawar: 'संधी असेल तर पुरेपूर फायदा घ्यायचा...', पवारांचा सत्ता मिळविण्याचा मास्टर प्लॅन!
Lok Sabha Election 2024: Sharad Pawar has told the master plan of what he will do if he gets a chance to establish power in the country.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Sharad Pawar: मुंबई: देशातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार हे बेरजेचं राजकारण करण्यात प्रचंड पटाईत आहेत. जिथे संधी मिळेल तिथे ते बेरजेचं राजकारण करत सत्ता काबीज करत असल्याचं आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता अशाच स्वरुपाची पुन्हा एकदा व्यूहरचना पवारांनी केली असून यावेळी थेट देशाची सत्ता मिळविण्यासाठी नवा मास्टर प्लॅन त्यांनी आखला आहे. (lok sabha election 2024 if there is an opportunity take full advantage sharad pawar told the master plan to get power)
ADVERTISEMENT
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी देशात भाजपला 2019 च्या तुलनेत अनुकूल परिस्थिती नसल्याचं म्हटलं आहे. तसंच जर बहुमतासाठी भाजपला आकड्यांची जुळवाजुळव करावी लागली तर त्या क्षणी जी संधी असेल तर त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा.. असं विधान शरद पवारांनी या मुलाखतीत केलं आहे.
देशाची सत्ता मिळविण्याचा 'हा' आहे शरद पवारांचा मास्टर प्लॅन!
'400 पारचा ट्रेंड खाली आलाय...'
'आकडा मी आजही सांगत नाही.. पण मला असं दिसतंय की, महाराष्ट्रात 50 टक्क्यांच्या आसपास जागा आम्हाला मिळतील. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली या निवडणुकीत संबंध देशात मोदीमय चित्र होतं. मोदींना सोडून ज्यांनी निवडणूक लढवलेली त्यांना त्याची किंमतही द्यावी लागली होती. महाराष्ट्रात माझ्या पक्षाला चार जागा, काँग्रेस आणि एमएमआयला 1-1 जागा मिळालेली. म्हणजे राज्यात 48 पैकी 5-6 जागा विरोधकांना मिळाल्या होत्या.'
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> 'तसला' Video पाहून अल्पवयीन भावा-बहिणीमध्ये शरीरसंबंध, नंतर...
'ती स्थिती आज नाहीए, त्या स्थितीत आज बदल दिसतोय. यावेळेला मोदी-मोदी हे जे चित्र होतं.. या वेळेला लोकांमध्ये अस्वस्थतता आहे.. याचं केंद्रबिंदू कोण असेल तर ते मोदी आहे.. मोदी यांच्याबद्दलची नाराजी ही शेतकरी वर्गात दिसतेय, तरूण पिढीमध्ये दिसतेय, कष्टकरी कामगार वर्ग आहे त्यांच्यामध्ये दिसते. या सगळ्या गोष्टीचा परिणाम मागच्या वेळेस त्यांना जे प्रचंड यश मिळालं होतं ते या वेळेला मिळणार नाही.'
'अद्याप काही ठिकाणी मतदान सुरू आहे. त्यामुळे 35-40 जागा असं बोलणं आता योग्य नाहीए. पण असं दिसतंय की, मागच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत फरक आहे.'
ADVERTISEMENT
'400 पारचा जो नारा दिला.. त्यानंतर ते 390 वर आले, 350 पर्यंत आले.. याचा अर्थ तो ट्रेंड खाली येतोय आणि जे 400 पार म्हणत होते ते देखील याबाबतीत जरा जपून असे शब्द वापरू लागले आहेत. त्यामध्ये ट्रेंड बदलतोय. जर संपूर्ण देशातील चित्र जर बघितलं अजून उत्तरेकडच्या निवडणुका होतायेत त्यामुळे आजच निष्कर्ष काढणं काही योग्य नाही.' असं शरद पवार यावेळी म्हणाले..
ADVERTISEMENT
'जर संधी असेल तर त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा..'
'मात्र, दक्षिणेत संधी नाही हे तर स्पष्ट आहे. आताचा ट्रेंड हा भाजपच्या विरोधी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात बघा.. बघाशी सांगितल्या प्रमाणे पाचच जागा जिथे होत्या.. त्या तर आता नक्की वाढतायेत.. आपण जर मध्य प्रदेशमध्ये गेलो तर एकच जागा काँग्रेसला होती. राजस्थान, गुजरात यामध्ये आता सुधारणा वाटतेय तिथे तर शून्य जागा होत्या विरोधकांना..'
हे ही वाचा>> दोघांना उडवलं; बापाला बेड्या अन् पबमधला 'तो' व्हिडिओ... वाचा Detail Story
'विशेषत: केजरीवालांचा पक्ष आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतोय ते पाहता येथील नंबर हा नक्की वाढेल. यात काही शंका नाही. यामुळे जो संबंध गठ्ठा जो मोदींना मिळायचा तो त्यांना मिळेल की नाही याबाबत शंकेची स्थिती आहे.'
'प. बंगालमध्ये देखील भाजपला मागच्या वेळी ज्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा 50 टक्के जागा त्यांच्या कमी होतील. हे सगळं एकत्र पाहिले तर हे 400 तर सोडा पण सरकार बनविण्यासाठी लागणारा आकडा हा कुठपर्यंत ते घेऊ शकतात हे आज सांगता यायचं नाही.. पण हे सांगता येतंय की, तो आकडा खाली येतोय.'
'जर भाजपला आकडा कमी पडला तर.. उद्या अशी परिस्थिती आली जसं तुम्ही म्हणता तसं.. तर माझ्यासारखे काही लोकं कशाचीही अपेक्षा न करता समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. हा आमचा प्रयत्न राहील की एक स्थिर सरकार देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करून एक स्थिर सरकार देण्यासाठी जर संधी असेल तर त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा..' असं म्हणत शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की, जर संधी मिळाली तर सत्ता स्थापन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
ADVERTISEMENT