Maha Vikas Aghadi : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार 'या' 10 जागा?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळू शकतात.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ जागावाटप

point

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळू शकतात १० जागा

point

ठाकरेंच्या शिवसेनेला 22 जागा मिळण्याची चिन्हे

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seats Sharing : महाविकास आघाडीतील जागावाटप पूर्ण झाले असल्याचे तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. काँग्रेस शिवसेना (युबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांमधील जागावाटप निश्चित झाले असले, तरी वंचित बहुजन आघाडीमुळे अंतिम निर्णय रखडला आहे. मात्र, समोर आलेल्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळू शकतात, अशी माहिती आहे. यातील एखादी जागा वंचितलाही द्यावी लागू शकते. (Maha Vikas Aghadi Lok Sabha Seats allocation Latest News)

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्याची महाविकास आघाडीचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही. तिन्ही पक्षांना देण्यात आलेल्या जागापैकीच काही जागा वंचितला दिल्या जातील. यात अकोला आणि नांदेड लोकसभा मतदारसंघही वंचितला दिला जाण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीमध्ये कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळू शकतो?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

1) बारामती
2) शिरूर
3) बीड
4) दिंडोरी
5) रावेर
6) अहमदनगर
7) माढा
8) सातारा
9) वर्धा
10) भिवंडी

हे वाचलं का?

हेही वाचा >> "याच्यासारखा नालायक माणूस नाही", अजित पवारांवर सख्खे भाऊ श्रीनिवास पवार संतापले

काँग्रेस

1) नागपूर
2) भंडारा-गोंदिया
3) चंद्रपूर 
4) गडचिरोली -चिमूर
5) रामटेक
6) अमरावती
7) अकोला
8) लातूर 
9) नांदेड
10) जालना
11) धुळे
12) नंदुरबार
13) पुणे
14) सोलापूर
15) कोल्हापूर
16) उत्तर मध्य मुंबई

हेही वाचा >> शिवसेना 22, राष्ट्रवादी 10, काँग्रेस 16; मविआत 'वंचित'चं काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

1) रायगड  
2) रत्नागिरी सिंधुदुर्ग
3) ठाणे
4) कल्याण
5) पालघर
6) उस्मानाबाद
7) परभणी
8) औरंगाबाद
9) बुलढाणा
10) हिंगोली
11) यवतमाळ-वाशिम
12) हातकणंगले (राजू शेट्टी यांना पाठिंबा)
13) सांगली
14) दक्षिण मुंबई
15) दक्षिण मध्य मुंबई
16) उत्तर पश्चिम मुंबई
17) उत्तर मुंबई 
18) ईशान्य मुंबई
19)नाशिक
20) शिर्डी
21) जळगाव
22) मावळ
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT