Uddhav Thackeray : ठाकरेंचा PM मोदींसह पटेलांवर हल्ला; 'ज्या डोक्यावर जिरेटोप घालताय, ते डोकं....'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

udhhav thackeray criticize praful patel and narendra modi gift jiretop varanasi before file nomination
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल पटेलांवर बोचरी टीका केली आहे.
social share
google news

Udhhav Thackeray criticize praful patel and narendra modi : वाराणसीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घातला होता. पटेलांच्या या कृतीवर आता हिंदु महासभा आणि संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतल्याने मोठा वाद पेटलाय. असे असतानाचा आता शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि प्रफुल पटेलांवर (Praful Patel) बोचरी टीका केली आहे. तुम्ही हा महाराजांचा अपमान करताय. तुम्ही लाचार झालायत, अशी टीका ठाकरेंनी केली आहेत. (udhhav thackeray criticize praful patel and narendra modi gift jiretop varanasi before file nomination) 

ADVERTISEMENT

पालघर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून ठाकरेंनी वाराणसीतील त्या घटनेवर भाष्य केले. 'प्रफुल भाई लाचारी किती करावी...तुम्ही त्यांना टोप्या घाला, दुसऱ्या कोणत्याही घाला, पण महाराजांच जिरेटोप ज्यांच्यावर डोक्यावर ठेवताय, ते डोकं कसं आहे ते तपासा,असा हल्ला ठाकरेंनी मोदींवर चढवला. तसेच प्रफुलभाई हा तुम्ही महाराजांचा अपमान करताय, तुम्ही लाचार झालात, मोदींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची शान घालवताय. मोदींनी असं महाराष्ट्रासाठी केलंय तरी काय?' असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. 

हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha Election : पवार, ठाकरेंना मोदींची 'ऑफर', चार राजकीय अर्थ!

'आज एक फोटो आला, प्रफुल पटेल यांना क्लीन चिट दिली. मुंबईत मोदींची सभा झाली तेव्हा मी भावूक झालो, असं म्हणाले. त्याच सभेमध्ये प्रफुल पटेल यांना कुछ लोग मिरची का व्यवहार करते है… असं ते म्हणाले, मग हे काय होतं?', असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
 
काल याच ठिकाणी भाजपचे लोक आले होते. मला काही प्रश्न विचारुन गेले… अमित शाहा तुम्हाला काही अक्कल असेल तर मी तुमच्यासोबत येतो, बोलतो. मला म्हणाले उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही. पण मी काय त्या मुहुर्त काढून त्याठिकाणी जायला तुमचा अंधभक्त नाही. मी मुख्यमंत्री असताना जावून आलो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 7 किलो सोने, 60 किलो चांदी...करोडोची मालकीण आहे बॉलिवूडची क्वीन

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT