Baramati Lok Sabha : शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुती गुलाल उधळणार का?
Sharad Pawar Vs Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक देशात चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मैदानात असल्या, तरी खरी प्रतिष्ठा शरद पवार आणि अजित पवारांची पणाला लागली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार
शरद पवार विरुद्ध अजित पवार
Baramati Lok Sabha Election, Supriya Sule Vs Sunetra Pawar : महाराष्ट्राबरोबर देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलेलं आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच ही लढत असून, काही अपवाद वगळता 1985 पासून हा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इतकी वर्ष पवारांना निवडणूक देणाऱ्या या या मतदारसंघातील उमेदवारांसमोर पहिल्यांदाच कोणत्या पवारांना मत द्यायचं हा प्रश्न उभा ठाकला आहे.
ADVERTISEMENT
पवारांचा गड असलेली बारामती जिंकण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न झाले आहेत, पण अद्याप हे साध्य होऊ शकलेलं नाही. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावली, पण विजय मिळू शकला नाही. दोन्ही वेळा सुप्रिया सुळे मताधिक्य घेऊन लोकसभेत गेल्या.
जानकरांना उतरवलं होतं रिंगणात
2014 मध्ये भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी देशात मोदी लाट होती. त्यात जातीय समीकरणं जुळवून आणत भाजपच्या ताकदीवर जानकर यांनी कडवी लढत दिली होती. पण, ६७ हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बारामतीत काय आहे समीकरण?
सुप्रिया सुळे यांना 2019 ची निवडणूक सोपी राहिली. पण, यावेळी ती अवघड झालेली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली आहे. पक्षही फुटला आहे. हीच संधी साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे दिसत आहे.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले. त्यानंतर शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह मिळवलं. आता अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांनाच सुप्रिया सुळेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 'महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगून टाकला!
आता पवार कुटुंबही फुटलं आहे. अजित पवारांचे सख्खे बंधू आणि पुतणे सुप्रिया सुळे यांच्या पाठिंशी आहेत. त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. पण, बारामतीतील राजकारण बदललं असल्याचे आता दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
मतदारसंघाची पुनरर्चना झाल्यानंतर २००८ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला. या मतदारसंघात पाच लाख मतदार आहेत. हा मतदारसंघ 2014 पासून भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. त्याचबरोबर दौंड मतदारसंघही भाजपकडे आहे.
हेही वाचा >> महायुतीत शिवसेना किती लढवणार जागा? शिंदेंनीच सांगितला आकडा
बारामतीत स्वतः अजित पवारचं आमदार आहेत. तर भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. असं असलं तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकदही आहे. इंदापूरमध्येही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच आमदार आहे. यातून अजित पवारांचं पारडं जड असल्याचे दिसत आहे. पण, मतदारांमध्ये शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसत आहे. त्याचाच निवडणुकीत परिणाम होऊ असे म्हटले जात आहे.
भाजपचे सर्वस्व पणाला
भाजपने बारामती जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसत आहे. भाजपने स्थानिक पातळीवरील मतभेद संपवून सुनेत्रा पवारांचे काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांसोबत ज्या नेत्यांचे मतभेद होते, तेही दूर केले आहेत. हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे आणि इतर नेते आणि अजित पवार यांच्यात भाजपने मध्यस्थी करत हे गणित जुळवून आणले आहे.
हेही वाचा >> "शिंदेंनी सांगावं की, मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होते?"
शरद पवारांना सहानुभूती मिळण्याची शक्यता असल्याने भाजपकडून बारामतीत मोदी विरुद्ध गांधी अशी ही निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनीही सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना यावर जोर दिला. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांवर टीका करण्याचे फडणवीसांनी बोलणे टाळले. त्यामुळे आता बारामतीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला यश मिळणार की, शरद पवार बालेकिल्ला कायम राखणार हे बघावं लागेल.
ADVERTISEMENT