Gajanan Kirtikar : "कीर्तिकरांचा निर्णय तीन दिवसांत होणार", शिंदेंचा नेता काय बोलला?
Gajanan Kirtikar Sanjay Raut : गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली असून, शिस्तभंग समितीकडे हे प्रकरण गेले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गजानन कीर्तिकरांवर कारवाई होणार?
शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काय झालं?
संजय शिरसाट यांनी काय दिली माहिती?
Shiv Sena Gajanan Kirtikar : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानामुळे पक्षातूनच नाराजीचे सूर उमटले आहेत. कीर्तिकरांची हकालपट्टी करण्याची मागणी झाली असून, त्या संदर्भात दोन-तीन दिवसात निर्णय होईल, अशी महत्त्वाची माहिती प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. (will Gajanan kirtikar expelled from Shiv Sena, Sanjay Shirsat Replied)
ADVERTISEMENT
गजानन कीर्तिकर यांनी केल्या विधानामुळे मित्रपक्ष भाजपचे नेते नाराज झाले आहेत. दुसरीकडे पक्षाचा उमेदवाराविरोधात रिंगणात असलेल्या ठाकरेंच्या उमेदवाराबद्दल कीर्तिकरांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे विधान केले होते. या सगळ्या प्रकरणावर संजय शिरसाट काय म्हणाले ते पहा...
"कीर्तिकरांनी ती भूमिका घेतली, याबद्दल सर्वांना संशय आहे. बोलून जरी दाखवत नसले, तरी कीर्तिकरांनी अशी भूमिका घेऊ नये, या मताचे आम्ही सर्वजण होतो आणि आजही आहोत. आपल्या मुलाच्या उमदेवारीबद्दल त्यांनी भाष्य करायलाच नको होते", अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली आहे.
हे वाचलं का?
कीर्तिकरांच्या घरात भांडणं लावण्याचा ठाकरे गटाचा डाव होता
"उबाठा गटाने केलेला तो गेम, तो त्यांच्या अंगलट आलेला आहे. त्यांच्याच घरातून उमेदवारी देऊन घरामध्ये भांडणं कशी लागतील किंवा त्यांना मजबुरीने यांचं काम कसं करावं लागेल, असा तो डाव होता", आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
हेही वाचा >> भाजप, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार; योगेंद्र यादवांनी मांडलं सगळं गणित
"कीर्तिकरांसारख्या मोठ्या नेत्याने शांत बसणे हा त्याच्यावरचा पर्याय होता. चर्चेला वाव दिलेला आहे आणि म्हणून चर्चेची ही लाईन कुठे जाईल सांगता येत नाही. तरी आमच्याकडे जी समिती आहे, त्या समितीकडे हे प्रकरण गेलेलं आहे. त्याच्यावर दोन-तीन दिवसांत निर्णय सुद्धा होईल", अशी माहिती शिरसाट यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठाकरेंचे दोन उमेदवार ठरले! शिवसेनेकडून (UBT) नावे जाहीर
"त्याच्यावर अखेरचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. पक्षाचे प्रमुख नेते म्हणून ते निर्णय घेतील. परंतू जी आमची समिती आहे, त्यांच्याकडे हे प्रकरण गेल्यामुळे त्यांच्याशी बोलून, त्यांचा अहवाल घेऊन कारवाई करायची की नाही, हे मुख्यमंत्री ठरवतील", असंही शिरसाट म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
आवरा नाहीतर त्यांचा मार्ग मोकळा करा -संजय शिरसाट
"मला वाटतं की, ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नये की ज्यामुळे पक्ष अडचणीत येईल. जर अशीच वक्तव्ये यांनी केली, तर इतरांकडे वेगवेगळा संदेश जातो. मग आम्हाला नाईलाजास्तव शिंदें साहेबांना सांगावं लागेल की, यांना कुठेतरी आवर घालण्याची वेळ आलेली आहे. यांना आवर घाला, नसता त्यांचा मार्ग मोकळा करा", असं म्हणत शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या हकालपट्टी मागणी केली आहे.
हेही वाचा >> "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर?
"एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. योग्य तो निर्णय निश्चित होईल. पण, नाही झाला तर त्यांच्यावर कारवाई करावी का, अशा प्रकारचा निर्णय एकनाथ शिंदे यांना घ्यावा लागेल", असे सांगत शिरसाट यांनी हकालपट्टीच्या कारवाईबद्दल भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT