अनन्या पांडेचं धक्कादायक विधान,मला सांगितलं होतं ब्रेस्ट सर्जरी करायला.आणि…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडमध्ये काम करताना अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींसाठी बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो असं बोललं जातं. ज्यांना अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी नाही किंवा बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नाही अशा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचे अनुभव आल्याचा खुलासा अनेकांनी केला आहे. याशिवाय बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागल्याचेही अनुभव अनेक अभिनेत्रींनी शेअर केले आहेत. अशात आता आणखी एका अभिनेत्रीनं बॉडी शेमिंग आणि इंडस्ट्रीमध्ये काम करताना ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला मिळाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

बॉलिवूडमध्ये काम करताना ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला मिळालेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे. अनन्या पांडेला अनेकदा ‘स्टार किड्सना देखील संघर्ष करावा लागतो’ या तिच्या स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जातं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्यानं इंडस्ट्रीतील तिचे अनुभव शेअर केले.

‘द रणवीर शो’मध्ये अनन्यानं करिअरच्या सुरवातीला तिला लिंग भेदाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला. एवढंच नाही तर तिला ब्रेस्ट सर्जरी करुन घेण्याचा सल्ला देखील देण्यात आल्याचंही तिने या शोमध्ये सांगितलं.

हे वाचलं का?

अनन्या पांडे म्हणाली, “लोकांनी मला चेहरा आणि बॉडीसोबतच ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. माझ्यासाठी हे खूप वेदनादायी होतं. मी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळी लोकांनी मला फार विचित्र सल्ले दिले. त्यांच्यासाठी असं सर्व बोलणं फारच सामान्य गोष्ट होती. अर्थात मला असं काही थेट सांगण्यात आलं नाही पण मला त्यांच्या बोलण्यातला अर्थ समजत असे. ते मला सांगायचे तुला वजन वाढवण्याची गरज आहे. सर्वात वाईट गोष्ट ही होती की लोक माझ्या शरीरावरून माझ्याबद्दल मतं व्यक्त करायचे.”

दरम्यान अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. तिने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘पती पत्नी और वो’ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘गहराइयां’ या चित्रपटांमध्ये दिसली. आगामी काळात ती दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत ‘लाइगर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूड पदार्पण करत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT