Bigg Boss Marathi 5 Grand Finale : सूरज, निक्कीला मिळणार गुलीगत धोका? 'हा' सदस्य उंचावणार बिग बॉसची ट्रॉफी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

बिग बॉस मराठीची विनर लिस्ट व्हायरल
bigg boss marathi 5 grand finale winner list viral abhijit sawant nikki tamboli janhavi killekar suraj chavan dhananjay powar ankita walawalkar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस मराठी 5 चा विजेता आज ठरणार

point

बिग बॉस मराठीची विनर लिस्ट होतेय व्हायरल

point

कोणता सदस्य ट्रॉफी जिंकणार?

Bigg Boss Marathi 5 Grand Finale : अवघ्या काही तासात आता बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सूरूवात होणार आहे. तत्पुर्वीच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी कोण उंचावणार हे ठरलं आहे. त्याप्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? कोणता सदस्य बिग बॉस जिंकणार आहे? आणि या सदस्याला किती प्राईज मनी मिळणार आहे? हे जाणून घेऊयात. (bigg boss marathi 5 grand finale winner list viral abhijit sawant nikki tamboli janhavi killekar suraj chavan dhananjay powar ankita walawalkar) 

ADVERTISEMENT

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या टॉप 6 सदस्यांमध्ये आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे.सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार हे सहा सदस्य प्रमुख दावेदार आहेत. या सहा सदस्यांपैकी एक सदस्य हा बिग बॉसची ट्ऱॉफी जिंकणार आहे. आता काही तासात या ग्रँड फिनालेला सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतं आहे. या पोस्टमध्ये काय आहे? हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड! 4500 नंतर 3 हजार खात्यात जमा, तुमचे आले का?

सोशल मीडियीवर बिग बॉस मराठीची विनर लिस्ट व्हायरल झाली आहे. या लिस्टमध्ये विजेत्याचे नाव सांगण्यात आले आहे. व्हायरल लिस्टनुसार निक्की, जान्हवी, अंकिता,सूरज आणि अभिजीत सावंत हे सदस्य टॉप 5 मध्ये पोहोचणार आहेत. पण या पाच सदस्यांसोबत धनंजय पोवार देखील सहावा सदस्य आहे. तर निक्की तांबोळी चौथी रनर-अप असेल, जान्हवी तिसरी रनर-अप असेल, सूरज तिसऱ्या क्रमांकावर असेल. अंकिता व अभिजीतमध्ये शेवटच्या क्षणी टक्कर होते आणि त्यामध्ये गायक अभिजीत सावंत विजेता ठरतो

किती प्राईज मनी मिळणार? 

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या विजेत्यासाठी 25 लाख रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं, पण घरातील सदस्यांनी वेगवेगळ्या टास्कमध्ये ही रक्कम जिंकावी लागणार होती. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी चक्रव्यूह टास्कमध्ये 25 लाख रुपयांपैकी 8.6 लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर पहिल्या तिकीट टू फिनालेच्या टास्कनंतर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ झाली. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांची किंमत ठरवायची होती. जो सदस्य टास्क जिंकेल त्याची किंमत बक्षिसाच्या रकमेत वाढवण्यात येणार होती. सूरजने हा टास्क जिंकल्यावर त्याची किंमत सहा लाख रुपये बक्षिसाच्या रकमेत जमा झाल्याने बिग बॉस मराठी विजेत्याच्या बक्षिसाठी रक्कम आता 14.6 लाख रुपये झाली आहे.

हे ही वाचा : Mumbai Local : बाईईई हा काय प्रकार? भरगच्च गर्दीत लोकलमध्ये महिला खेळल्या गरबा; Video व्हायरल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT